विद्यावेतन मिळावे म्हणून विद्यार्थ्यांचे तीन दिवसांपासून विद्येच्या माहेर घरात उपोषण.. ...

 या बाबत राज्यसरकार ने तात्काळ लक्ष घालून विद्यार्थांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे..

प्रेस मीडिया लाईव्ह विद्यार्थांचा प्रश्न उचलुन धरणार...

प्रेस मीडिया लाईव्ह;

 अन्वरअली शेख : (सह संपादक ) 

पुणे दि.१०  विद्याचे माहेरघर पुणे शहरात विद्यार्थ्यांचा ( फेलोशिप ) विद्यावेतन  मिळावा म्हणून गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केलेले आहे. या तीन दिवसात  शासकीय अधिकाऱ्यांकडून दखल घेण्यात आलेली नाही  व राज्य सरकारने ही या बाबत लक्ष दिलेले नाही.  सरकारला जाग कधी येणार..?  या चिंतेत विद्यार्थी पडले आहेत 

विद्यावेतन मिळवा म्हणून विद्यार्थ्यांनी अनेक वेळा आंदोलनं करुन  मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव, बार्टीचे महासंचालक यांचं ही लक्ष वेधलं परंतु सरकार काहीच पाऊल उचलत नाहीत .असा आरोप केला जात आहे एम फिल ते पीएचडी सलग पाच वर्षाचा फेलोशिप मिळावी या मागणीसाठी बार्टी 2018 संशोधक विद्यार्थी बार्टी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण करत आहे. एमफिल आणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर विद्यावेतनासाठी उपोषण करण्याची वेळ ओढवली आहे.

आज अनेक विद्यार्थी दुष्काळात होरपळलेल्या विविधद्ध गावातून उच्च शिक्षणासाठी पुण्यात येतात.वेगवेगळ्या सर्व्हेची कामं करून आतापर्यंतचा खर्च भागवलेला आहे पण आता मात्र पुढे वाचा फुटताना दिसत नाही, बहुतांश विद्यार्थ्यांच्या घरच्यांची परस्थिती कोरोना काळात अत्यंत बिकट अशी झालेली आहे.आता आई वडिलांना पैसे कसे मागायचे ?त्या मुळे आमची विद्यावेतन ( फेलोशिप ) हाच आधार होता. ते ही मिळत नाहीये,नोकरी करायची म्हटलं तर रिसर्चसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे फेलोशिपची गरज आहे. सरकारन  एम फिल phd. च्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करूनये अशी गुहार विद्यार्थ्यांनी लावली आहे.

 या बाबत  पुण्यातील राजनीतिक पक्ष सुद्धा या विद्यार्थ्यांचा प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत,  या बाबत अद्याप कोणाकडून ही दखल घेण्यात आलेली नाही..

प्रेस मीडिया लाईव्ह चे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान हे विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून सतत मीडिया क्षेत्रात पाठपुरावा करत आहे.

दोन दिवसा मागे पुणे शहर एम आय एम च्या महिला उपाध्यक्षा  सुमय्या पठाण , मुबीन खान, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. तसेच विद्यार्थांच्या या प्रश्नाबाबत आदर्श पत्रकार महासंघ महाराष्ट्र ने पाठिंबा दर्शवला असून याचा पाठपुरावा करून  विद्यार्थ्यांना न्याय मिळून देऊ असे आदर्श पत्रकार महासंघचे  प्रदेश अध्यक्ष मेहबूब सर्जेखान व राज्य उपाध्यक्ष दत्तात्रय खडके यांनी सांगितले.


प्रेस मीडिया लाईव्ह 

   अन्वरअली शेख : ( सह संपादक ) :

Post a Comment

Previous Post Next Post