ब्रेकिंग न्यूज : इचलकरंजीत झालेल्या वादळी पावसामुळे सर्वत्र दानादान उडाली


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी : मनु फरास :

इचलकरंजीत झालेल्या वादळी पावसामुळे सर्वत्र दानादान उडाली आहे.  दुपारी चार वाजता अचानक पावसाची  सुरवात  झाली बघता बघता पावसाचे वादळी रूप बघायला मिळाले . एक तास झालेल्या वादळी पावसाने सर्वत्र हाहाकार  उडवून  दिला. पावसामुळे वीज पुरवठा पुर्ण  खंडित झाला असून अद्याप लाईट सुरू झालेली नाही  तर स्टेशन रोड डेक्कन मिल समोर झाडे तुटून पडली आहेत. या मुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत  झालेचे दिसत आहे तर  वादळी वाऱ्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.



हत्ती चौक परिसरात  वादळी वाऱ्यामुळे झाडे पडली  आहेत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची वाट न पाहता  या भागातील नागरिकांच्या मदतीने पडलेली झाडे तोडुन रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात आला तर  महावितरणचे अधिकारी श्री महाडिक  यांना सांगून  तुटलेल्या विजेच्या तारा जोडून घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत  करण्यात आला. 

या कामांमध्ये भागातील माजी नगरसेवक संजय जाधव , ज्ञानेश्वर उरणे , रणजीत सावंत व परिवार,  अक्षय उरणे,  ईश्वर सुतार बाळासो वडेकर , बबन भागवत महंमद अन्सारी असे सर्वांच्या मदतीने तुटलेले झाड व्यवस्थित तोडून बाजूला केल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post