क्राइम न्यूज : अपहरण करून पन्नास लाखाची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना सांगली पोलिसांनी मुसक्या आवळल्या .

कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्यासाठी आरोपींनी हा अपहरणाचा डाव आखला होता.

प्रेस मीडिया लाईव्ह :

 सांगली :  शिक्षक आणि त्याच्या मुलाचे फिल्मी स्टाईल अपहरण करून पन्नास लाखाची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना सांगली पोलिसांनी मुसक्या आवळल्या . या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे.केवळ 12 तासात सांगली पोलिसानी अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्यासाठी आरोपींनी हा अपहरणाचा डाव आखला होता.

कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्यासाठी एका पिता-पुत्राच्या अपहरणाचा डाव आखल्याची घटना सांगली मध्ये समोर आली आहे. या पिता-पुत्राकडे आरोपींनी 50 लाखाची खंडणी देखील मागितली होती. मात्र 50 लाख देण्याची धमकी देत त्यांना सोडून देण्यात आले या चुकी मुळे आरोपीचा खेळ फसला. अपहरण झालेल्या व्यक्तीने थेट पोलीस स्टेशनला जात ही घटना सांगितल्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपी समीर पखाली सह अन्य काही जण कर्जबाजारी झाले होते. शिक्षक असलेल्या ढोले यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती याची माहिती आरोपींना होती. यातूनच त्यांचे अपहरण करून खंडणी उकळण्याचा प्लॅन आखला.

अपहरण झालेल्या ढोले यांची गावातील पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झालेल्याची माहिती आरोपींना होती. त्यामुळे आरोपींनी आधी या पिता पुत्राच्या अंगावर गुलाल टाकला जेणेकरून ते दोघेजण आरडाओरडा न करता आपल्या ओळखीतील हे लोक आहेत असा त्यांचा समज होईल. पण गुलालात माखवून मग आरोपींनी या दोघांचे अपहरण केले.अपहरणकर्त्यांनी कसबे डिग्रजजवळ शिक्षक ढोले आणि त्यांच्या मुलाचं डोळ्यात गुलाल टाकून जीवे मारण्याची धमकी देत 50 लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केले. त्यानंतर या दोघांना अज्ञातस्थळी नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिक्षक ढोले यांच्याजवळचे 22 हजार रुपयेही काढून घेतले.

या घटनेनंतर सांगलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके याच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी उपविभागातील पोलीस ठाण्याच्या 4 टीम तयार करून सापळा लावून अपहरण करणाऱ्या समीर पखाली, अल्झार चौगले , तोहीद मुलाणी, जुबेर चौगले यांना अटक केली. या अपहरणकर्त्यांकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post