इचलकरंजी शहरातील वाहतूक सिग्नल यंत्रणेचे शहरवासीयांनी नियमानुसार पालन करावे

 प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल.

    

प्रेस मीडिया लाईव्ह :

  इचलकरंजी शहरामध्ये विविध चौकात वाहतूक सुरळीत होणे साठी नगरपरिषदे मार्फत सिग्नल यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासुन तांत्रिक बिघाड झाल्याने शहरातील काही ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद अवस्थेत होती. 


त्यामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी नगरपरिषदेकडे येत होत्या.या अनुषंगाने शहरवाहतूक  नियंत्रण शाखेचेसहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांचेसोबत झालेल्या बैठकी नुसार प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी नगर अभियंता विद्युत संदिप जाधव यांना शहरातील सिग्नल यंत्रणा तातडीने कार्यान्वित करणेचे आदेश दिले होते.

 सदर आदेशानुसार आज गुरुवार दि.१०मार्च रोजी डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांच्या उपस्थितीत शहरातील के.एल.मलाबादे चौक आणि डेक्कन चौक येथील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. याचबरोबर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ, छत्रपती शाहू महाराज पुतळा, झेंडा चौक, थोरात चौक याठिकाणी सुद्धा सिग्नल यंत्रणा सुरू करणेत येणार आहे.

   याप्रसंगी प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सिग्नल यंत्रणेचे तंतोतंत पालन करुन वाहतूक सुरळीत होणेस सहकार्य करावे असे आवाहन केले.


   अनवरअली शेख : सह संपादक :

Post a Comment

Previous Post Next Post