गोवा ब्रेकिंग : भाजप सत्ता कायम रखणार की, काँग्रेस सत्तेत येणार हे ..?

 कॉंग्रेस आणि भाजपची  प्रतिष्ठा पणाला


प्रेस मीडिया लाईव्ह : 

गोवा :

आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल  जाहीर होणार आहे.मतदारांनी कोणाच्या पारड्यात जनमताचा कौल दिला ते स्पष्ट होणार आहे . तर गोव्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार लढथ रंगल्याचे चित्र एक्झिट पोल मध्ये दिसत आहे. दोघांमध्ये मोठी स्पर्धा असून, भाजप सत्ता कायम रखणार की, काँग्रेस सत्तेत येणार हे सांगता येत नाही. मात्र कॉंग्रेस आणि भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली असल्यानं आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गोव्यात मुख्यमंत्री कुणाचा होणार....? या विषयी राजकीय वर्तुळातून जोरदार चर्चा सुरू आहे.

 

काँग्रेस-भाजप मध्ये मुख्य लढत  होत असली तरी उत्पल पर्रीकरांसह अनेक अपक्षांनी देखील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढवली आहे. सोबतच शिवसेना देखील या निवडणुकीत जोमाने उतरलेली पाहायला मिळाली

गोव्यात कुणाची प्रतिष्ठा पणाला...?

प्रमोद सावंत (भाजप) - साखळी

डॉ. प्रमोद सावंत हे व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. प्रमोद सावंत हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती आहेत. ते यापूर्वी कधीही मंत्री झाले नाहीत. परंतु 2019 साली गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर भाजप नेते आणि गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत विराजमान झाले.

दिगंबर कामत (काँग्रेस) - मडगाव
मनोहर आजगावकर (भाजप) - मडगाव
अमित पालेकर (आप) - सांताक्रूझ
मायकल लोबो (काँग्रेस) - कळंगुट
उत्पल पर्रिकर (अपक्ष) - पणजी
उत्पल पर्रिकर हे भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र आहेत. पणजीतून उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून उभे राहिले आहेत.

बाबूश मोन्सेरात (भाजप) - पणजी

Post a Comment

Previous Post Next Post