पुणे : नळस्टॉप येथे उभारण्यात आलेल्या दुहेरी उड्डाणपुल रविवार पासून प्रवासासाठी खुला होणार


प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख : (उपसंपादक )

 पुणे शहरातील वाहतूकीची  कोंडी फोडण्यासाठी नळस्टॉप येथे उभारण्यात आलेल्या दुहेरी उड्डाणपुल रविवार पासून प्रवासासाठी खुला होणार आहे.शहातील वाहतुकीला या मुळे वेग येणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन कडून महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आला असून पुलाच्या विद्युत व्यवस्थेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या उड्डाण पुलाचे उदघाटन विरोधी पक्षनेता देंवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नळस्टॉप परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरून दर तासाला 35 ते 40 हजार वाहने जा-ये करतात. त्यामुळे या भागात तातडीने उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते.

या दुमजली पुलामुळे कर्वे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. महापालिकेच्या सन 2017-18 अंदाजपत्रकात दुमजली उड्डाणपुलाची संकल्पना तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष आणि विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. जयपूर येथील दुमजली उड्डाणपुलाच्या धर्तीवर शहरात उभारण्यात आलेला हा पहिलाच दुमजली उड्डाणपूल आहे.

या उड्डाण पुलामुळे डेक्कन परिसरातून पश्चिम पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला गती मिळणार आहे. नळस्टॉप परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरून दर तासाला 35 ते 40 हजार वाहने जा-ये करतात. त्यामुळे या भागात तातडीने उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. नळस्टॉप येथील दुमजली उड्डाणपुलामुळे केवळ पश्चिम पुणेच नाही तर हवेली आणि मुळशी तालुक्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसही वेग येणार आहे.




अनवरअली शेख : सह संपादक 

Post a Comment

Previous Post Next Post