क्राईम न्यूज : पुणे दत्तवाडी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणाऱ्या तिघा पोलिसांनीच

 लुटमारीत हात धुऊन घेतल्याचे समोर आल्याने खळबळ...

नारपोली पोलिसांनी तिघांना अटक केली

प्रेस मीडिया लाईव्ह :

 नाशिक मार्गे मुंबई येथे हेणारे हवाला रॅकेटचे 45 लाख हायवे दिवे येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर त्रिकुटाने लुटले. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी एका आरोपीस पुणे इथून अटक केली.या आरोपीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली असून पुणे दत्तवाडी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणाऱ्या तिघा पोलिसांनीच या लुटीत हात धुऊन घेतल्याचे समोर आले. या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून नारपोली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

संभाजीनगर येथील रामलाल परमार हे 8 मार्च रोजी ब्रिझा कारमधून नाशिकच्या व्यापाऱ्याची हवाला व्यवहारातील 5 कोटी रुपयांची रोकड विविध बॅगेमध्ये घेऊन मुंबई येथे देण्यासाठी निघाले. यावेळी हायवे दिवे येथे दबा धरून बसलेल्या तिघांनी कार थांबवून कारमधील 45 लाख रोकड असलेली बॅग घेऊन पोबारा केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पुणे आयुक्तालयातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत गणेश शिंदे, गणेश कांबळे, दिलीप पिलाने यांचा सहभाग समोर आला.

चोरट्या पोलिसांच्या मुसक्या आवळल्या.

आरोपी तिन्ही पोलीस कर्मचारी गुन्ह्या दरम्यान ऑन ड्युटी होते. रात्री 11 वाजता त्यांनी पुणे ते भिवंडी प्रवास करून सकाळी 4 वाजता ते गुन्हा घडलेल्या ठिकाणी दबा धरून बसले होते. लुटमार करून पुन्हा पुणे येथे कामावर हजर झाले. त्यांनी या लुटीमधील प्रत्येकी नऊ लाख रुपये आपापसात वाटून घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारमध्ये 5 कोटींची रक्कम असताना पोलिसांना फक्त 45 लाखांची टीप मिळाल्यामुळे उर्वरित रक्कम लुटीच्या डल्ल्यातून बचावली. नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ आणि त्यांच्या टीमने या चोरट्या पोलिसांच्या मुसक्या आवळल्या.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

अनवरअली शेख : सह संपादक 

Post a Comment

Previous Post Next Post