प्रेस मीडिया ऑनलाइन
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
कामोठे वसाहतीमधील एका भोजनालयात असलेल्या सिलेंडरचे स्फोट होऊन लागलेल्या आगीत या भोजनालय असलेल्या बाजूला असलेल्या दोन घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
सिलेंडरचे स्फोट (Cylinder Blast) झाले व त्या स्फोटामध्ये बाजूच्या घरांना सुद्धा आग लागून त्यांचे मोठे नुकसान झाले. स्फोटाच्या आवाजामुळे आजूबाजूचे सर्व रहिवाशी घराबाहेर पडल्यामुळे कुठलीही जिवीतहानी झाली नाही. साधारण 4 सिलेंडरचे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
या घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलीस (Police) ठाण्याचे पथक तसेच पनवेल अग्नीशमन (Fire-Brigade) दलाचे बंब व कळंबोली अग्नीशमन दलाचे बंब असे 4 ते 5 बंब घटनास्थळी पोहचून त्यांनी अवघ्या 15 ते 20 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविल्याने आग पसरली नाही. सायंकाळची वेळ असल्याने मोठ्या प्रमाणात या भागात रहदारी असते. त्यामुळे आग पसरली असती तर मोठी जिवीतहानी झाली असती.