प्रभाग समजून घेताना इच्छुकांना घाम फुटू लागला...

पुण्यातील नगरसेवक संख्या १६४ वरून १७३ इतकी झाली.


प्रेस मीडिया ऑनलाइन :

जीलानी (मुन्ना) शेख :

पुणे :  पुणे महानगरपालिकेने १७३ नगरसेवकांना निवडून देण्यासाठी ५८ प्रभागांचा प्रारूप आराखडा सादर केला. या मध्ये मोठ्याप्रमाणात तोडफोड केल्याने प्रभाग समजून घेताना इच्छुकांना घाम फुटला आहे. महापालिकेत २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट झाली होती. तेथील १. ५० लाख लोकसंख्येच्या आधारावर दोन नगरसेवकांचा समावेश महापालिकेत झाला होता. तर जून २०२१ मध्ये २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. तेथील लोकसंख्या १. ९० लाख असल्याने आणखी दोन नगरसेवकांची भर पडणार आहे. राज्य सरकारने नगरसेवकांची संख्या वाढविण्यासाठी निर्णय घेतल्याने पुण्यातील नगरसेवक संख्या १६४ वरून १७३ इतकी झाली.

समाविष्ट ३४ गावातून ४ नगरसेवक वाढतील असे सांगितले जात होते. मात्र, आज (ता. १) जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत लोहगाव-विमाननगर, वाघोली इआॅन पार्क, बाणेर सुस म्हाळुंगे, मांजरी शेवाळवाडी, साडेसतरानळी-आकाशवाणी, हडपसर- सातववाडी, वारजे कोंढवे धावडे, रामनगर- उत्तमनगर शिवणे, फुरसुंगी, मोहम्मदवाडी-उरुळी देवाची, नांदेड सिटी सनसिटी, खडकवासला नऱ्हे, धायरी आंबेगाव गावांचा समावेश आहे.

तीन सदस्यांचा प्रभाग असल्याने १३ प्रभागातून तब्बल ३९ नगरसेवक निवडून दिले जाणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी भाजप (BJP), राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) समाविष्ट गावांचा समावेश असलेल्या प्रभागांवर जास्त लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post