प्रेस मीडिया ऑनलाइन :
पुणे : पुणे येथे महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेची वार्षिक आढावा बैठक व महाराष्ट्रातील विविध निवड संपन्न झाली.
मा. नदीम भाई मुजावर संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक आढावा बैठक व महाराष्ट्रातील विविध निवड करण्यात आली. या मध्ये सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे समाजासाठी नेहमी धडपड करणारे समाजाचे सेवक व मराठवाडा येथे संघटन बळकट करून संघटना वाढीसाठी नेहमी प्रयत्न करणारे मराठवाडा अध्यक्ष आसिफ जमादार यांची महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मुस्लिम फ्रंट पदी निवड करण्यात आली. व पुणे शहर अध्यक्ष एजाज सय्यद यांची ही महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच आतिक शेख मराठवाडा प्रवक्ता मुस्लिम फ्रंट, रफीक खान सोलापुर जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
सदरील निवडी झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व भविष्यात संघटनेच्या माध्यमातून समाजाची सेवा करावी व तसेच संघटनेच्या माध्यमातून गोरगरीबांना सहकार्य करुन समाजाचे विविध समस्याचे निवारण करावे व संघटन बळकट करावे असे संघटनेच्या वतीने नुतन पदाधिकारी यांना सांगण्यात आले.
या वेळी प्रमुख सल्लागार राजेंद्रसिंग वालिया,शहाजी सावंत, विनोद सोलंकी, कुंदन पूनावाला, पुणे जिल्हा अध्यक्ष हाजरा कबीर,शाकीर शेख शहर अध्यक्ष पिंपरी-चिंचवड, राजु भाई चाऊस कार्याध्यक्ष , आशा पाटुळे मॅडम कोअर कमिटी,व्ही.एम. कबीर कोअर कमेटी, हाजी खाजा भाई पठाण, एजाज सय्यद शहर अध्यक्ष, प्रवक्ते रफिक मुल्ला सर, खजिनदार इरफान शेख, आसलम शेख इंदापुर तालुका अध्यक्ष आदी उपस्थित होते.
प्रस्तावना पुणे शहर अध्यक्ष रफिक मुल्ला सर व सूत्र संचालन संघटना खजिनदार इरफान भाई शेख यांनी केले.