देहूरोड सुभाष चौक येथे ई.डी. व तनाशही केंद्र सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध

 अल्पसंख्यांक मंत्री  जेष्ठ नेते   नवाब मलिक यांना केंद्र सरकारचे बाहुले असलेली  ई.डी. तपास यंत्रणा कक्षाने अटक केली आहे त्याच्या निषेधार्थ.....



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली शेख :

देहूरोड दि.२३ राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी बुधवारी अटक केली.  न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. देहूरोड शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नवाब मलिक यांना अटक झाल्या नंतर आता ठीक ठिकाणी   आंदोलने करण्यात येत आहे. 

सुभाष चौक देहूरोड बाझार येथे  ई.डी. व तनाशही करणारी केंद्र सरकारचा निषेध राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल अध्यक्ष शंकर स्वामी यांच्या नेतृत्वात करण्यात आला मोठ्या संख्ये ने सर्व सेलचे अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 प्रेस मीडिया लाईव्ह  : 

पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post