देहूरोड छावणी परिषद कार्यालयावर बहुजनांच्या न्याय व हक्कासाठी

  गोपाळराव तंतरपाळे यांच्या नेतृत्वात धडकला प्रचंड मोर्चा 

प्रेस मीडिया लाईव्ह 

पुणे जिल्हा प्रतिनिधी :  अन्वरअली शेख :


देहूरोड शहराच्या वार्ड क्रमांक चार कृष्णनगर येथून सकाळी साडेअकराच्या सुमारास गोरगरीब कष्टकरी लोकांच्या घर व दुकानावर अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांसाठी मा. नगरसेवक गोपाळराव तंतरपाळे यांच्या प्रमुख  नेतृत्वाखाली देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड वर प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता,या मोर्च्यामध्ये मोठया संख्येने महिला व नागरिक सहभागी झाले होते,

 मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्या विरोधात मोठया प्रमाणात जन आक्रोश निर्माण झालेला दिसून येत होता, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भ्रष्ट, व सुस्त अधिकाऱ्यांच्या कारभारा विरोधात जबरदस्त घोषणाबाजी करण्यात आल्या. गोरगरिबांच्या घरा दारा कडे वाकड्या नजरेने पाहणार्‍ यां भ्रष्ट कारभाराविरोधात मी सदैव लढा देत राहील अशा कडव्या शब्दात निंदा करत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य द्वाराजवळ निदर्शने करण्यात आली .

 देहूरोड पोलीस  मुख्य निरीक्षक सौ. वर्षाराणी पाटील यांनी मध्यस्थी करत विनंती केल्यामुळे आंदोलन कारी शांत झाले.

या वेळी धर्मपाल तंतरपाळे, संतोष चौगुले,शकुर भाई शेख, अजय बिडलान, रमेश पवार,सौ धनश्री दिंडे मॅडम,श्री तांबे, पाटोळे,राजेंद्र लोट,  राकेश वाल्मिकी, नईम भाई मुल्ला व इतर कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते।


प्रेस मीडिया लाईव्ह  : 

पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :

Post a Comment

Previous Post Next Post