कामगारांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख आणि जखमी कामगारांना प्रत्येकी २ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : येरवड्यात बांधकाम साईटवर झालेल्या अपघातांमुळे पाच बांधकाम कामगारांचे दुर्दैवी मृत्यू झाले होते आणि चार कामगार जखमी झाले होते. मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख आणि जखमी कामगारांना प्रत्येकी २ लाखांची आर्थिक मदत महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने 26/02/2022 रोजी देण्यात आली..
बांधकाम मजदूर सभा, महाराष्ट्र या आमच्या बांधकाम कामगार संघटनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अवघ्या २२ दिवसात सदर आर्थिक मदत मिळणे शक्य झाले.
यावेळी आमदार सुनील टिंगरे, बांधकाम मजदूर सभा, महाराष्ट्राचे अध्यक्ष अँड मोहन वाडेकर, सरचिटणीस नितीन पवार, अतिरिक्त कामगार आयुक्त अभय गीते साहेब, सहायक कामगार आयुक्त मुजम्मील मुजावर साहेब, कामगार नेते काशिनाथ नखाते, मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार, अमजद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत धनादेश वाटपाचा कार्यक्रम झाला...