मावळ तालुक्‍यातील सोमाटणे फाटा येथे अतिक्रमण विरोधी जोरदार कारवाई

 कारवाईत तीन मजली इमारत व हॉटेल जमीनदोस्त करण्यात आले.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :

पिंपरी - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण  यांनी मावळ तालुक्‍यातील सोमाटणे फाटा येथे अतिक्रमण विरोधी जोरदार कारवाई केली. शुक्रवारी सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.या कारवाईत तीन मजली इमारत व हॉटेल जमीनदोस्त करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पीएमआरडीएने पिंपरी चिंचवड पोलीस व वाहतूक पोलीस यांना बरोबर घेऊन सोमाटे फाटा येथील एक तीन मजली इमारत व मिसळ सेंटरवर कारवाई केली. या कारवाईसाठी तीन पोकलेन, जेसीबीच्या साहायाने अतिक्रमण हटाविण्यात आले. हिंजवडी, माण, मारुंजी या भागात पीएमआरडीएकडून मोठ्या कारवाया केल्या जात होत्या.

आज मात्र मावळ तालुक्‍यात कारवाई करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमाटने फाटा येथील जोगेश्‍वरी मिसळ सुरू करण्यात आले. मात्र पीएमआरडीएने केवळ मिसळ सेंटरवर कारवाई करत इतर इमारतींना मात्र हात न लावल्याने कारवाईबाबत नागरिकांमध्ये मोठी चर्चा आहे. एका तीन मजली इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु इतर इमारतींना मात्र धक्‍का न लावता पीएमआरडीए निघून गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये कारवाई बाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post