प्रेस मीडिया लाईव्ह तर्फे उत्कृष्ठ समाजकार्य पुरस्कार

 श्री. दिनेश नामदेव तावरे, परिमंडळ अधिकारी अ व ज विभाग, निगडी (पिंपरी चिंचवड) यांना प्रदान.

प्रेस मीडिया लाईव्ह

 पुणे जिल्हा प्रतिनिधी :  अन्वरअली शेख :

पिंपरी चिंचवड निगडी येथील परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रेस मीडिया लाईव्ह डॉट कॉम पुणे यांच्या वतीने दिनांक 25 फेब्रुवारी रोजी परिमंडल अधिकारी दिनेश नामदेव तावरे यांना उत्कृष्ट समाजकार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .


अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे कार्यालय अंतर्गत, परिमंडळ कार्यालय अ व ज विभाग निगडी पुणे - श्री दिनेश नामदेव तावरे परिमंडळ अधिकारी अ व ज विभाग निगडी  यांना गौरविण्यात आले.त्यांच्या चांगल्या कार्याबद्दल संपूर्ण विभागात चर्चा केली जात आहे. १४४ दिव्यांग व्यक्तींना शिधापत्रिकेचे वितरण करण्यात आले. कार्यालयाच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांना कामात सुविधाही प्राप्त करून देण्याकरिता तक्रार पेटी उपक्रम राबवत ,कार्यालयात तक्रार पेटी बसवण्यात आली आहे.

शिधापत्रिकाधारक / अर्जदार यांना कार्यालयात ,बसण्याची उत्तम व्यवस्था , पिण्याचे  शुद्ध पाणी , प्रसाधन गृह  प्रथमोपचार आदी व्यवस्था  निगडी येथील त्यांच्या कार्यालयात  सुविधा केल्या आहेत आजच्या काळातील सुसज्ज कार्यालय तयार केले आहे, येणाऱ्या अर्जदार नागरिकांसाठी सुविधा पूर्वक व्यवस्था करण्यात आली आहे, दिनेश तावरे अगदी तळागाळा पर्यंत जाऊन प्रत्येक कामाचे नियोजन करतात. मागील काही वर्षापूर्वी सांगली शहरात महापुर पुर आला होता त्या वेळी  तेथील जनतेला धान्य पाठवण्यासाठी  शासनाचे आदेश मिळाल्यानंतर त्यांनी रात्री ज्या वेळेस कोणीही हमाल नसताना  त्यांनी स्वतःच्या पाठीवरती धान्याची पोती उचलत गाडी लोड करून सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवली होती. 

  त्यांच्या या  सर्व कार्यांची दखल घेत, प्रेस मीडिया लाईव्ह यांच्या पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली, व पिंपरी चिंचवड प्रतिनिधी पठाण एम एस,  यांच्या हस्ते उत्कृष्ट समाजकार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

त्यावेळी अन्वरअली शेख पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रेस मीडिया लाईव्ह, मुशीर पठाण  पिंपरी चिंचवड प्रतिनिधी  प्रेस मीडिया लाईव्ह,रज्जाक शेख पूना खबर संपादक, तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि जमीयेत उलमा पिंपरी चिंचवड सदस्य आ.रज्जाक शेख हे ही उपस्थित होते.


प्रेस मीडिया लाईव्ह

 पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली

Post a Comment

Previous Post Next Post