मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात यावा सर्व शासकीय कार्याल्यांना देहूरोड मनसे शहर तर्फे निवेदन

 घासल्या शिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला , मराठी भाषा शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला..


प्रेस मीडिया लाईव्ह

 पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली शेख :



मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला होता.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना देहूरोड शहर तर्फे मा. मोजेस दास मावळ तालुका उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शना खाली जॉर्ज दास देहूरोड शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड ,देहूरोड पोलीस स्टेशन, सर्व इंग्रजी व मराठी शाळा, बँका, पोस्ट ऑफिस या सर्व कार्यालयांना मराठी  भाषा गौरव दिवस साजरा करा म्हणून निवेदन देण्यात आले आहे.

 या वेळी उपस्तित दीपक भालेराव उपाध्यक्ष मावळ तालुका,मलिक शेख म.न.वि.से अध्यक्ष देहूरोड,करीम शेख म.न.वा.से देहूरोड अध्यक्ष,डॉमनिक दास उपाध्यक्ष देहूरोड मनसे, आसिफ सय्यद शाखा अध्यक्ष निलोफर मुलानी शाखा अध्यक्षआदी उपस्थित होते.


प्रेस मीडिया लाईव्ह  : 

पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post