सेन्सेक्स तब्बल 1543 अंकांनी कोसळल्यामुळे बाजार गारठला.

 गुंतवणूकदारांच्या 8 लाख रुपयांचा चुराडा .

प्रेस मीडिया ऑनलाइन :

सुनिल पाटील : 

कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'ओमायक्रॉन'ची लाट पसरल्यामुळे जगभरात आर्थिक अनिश्चितता वाढली आहे. त्याचे पडसाद सोमवारी मुंबई शेअर बाजारात उमटले. सेन्सेक्स तब्बल 1543 अंकांनी कोसळल्यामुळे बाजार गारठला . गुंतवणूक दारांच्या 8 लाख रुपयांचा चुराडा झाला. 'निफ्टी'चाही अंक 468ने कोसळला आहे.

आठवडय़ाच्या सुरुवातीला शेअर बाजारात उत्साह असेल असा अंदाज होता. मात्र, बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी शेअर्स विक्रीचा धडाका लावला. त्यामुळे सुरुवातीपासूनच सेन्सेक्स घसरण्यास सुरुवात झाली. मध्यांतराला सेन्सेक्स 2050 अंकांनी कोसळला. त्यात काहीशी सुधारणा झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स 1545 अंकांनी कोसळला. सेन्सेक्स 57491 अंकांवर स्थिरावला होता. गेल्या दोन महिन्यांतील ही सर्वात मोठी पडझड आहे. याचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसला असून, शेअर्सचे बाजारमूल्य तब्बल 8 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजार 'निफ्टी'च्या अंकाचीही 468ने पडझड झाली. 'निफ्टी'चा सेन्सेक्स 17149 अंकांवर स्थिरावला होता.

सर्वच क्षेत्रांत पडझड

  • बँक, रियल इस्टेट, ऑटो, स्टील, सॉफ्टवेअर अशा सर्वच क्षेत्रातील शेअर्स कोसळले.
  • सर्वाधिक पडझड टाटा स्टीलची पाहायला मिळाली. शेअर सहा टक्क्यांनी कोसळला. बजाज फायनान्स, विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल, पेटीएम, झोमॅटो, एसबीआयच्या शेअर्समध्येही मोठी पडझड पाहायला मिळाली.

ही आहेत कारणे

  • 'ओमायक्रॉन'चा वाढत्या संसर्गामध्ये जगभरात आर्थिक अनिश्चितता आहे.
  • गुंतवणूकदारांकडून शेअर्स विक्रीचा सपाटा.
  • अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. उद्यापासून (दि. 25) यासंबंधीची बैठक सुरू होणार आहे. तत्पूर्वीच विदेशी गुंतवणूकदारांकडून हिंदुस्थानसह अनेक देशांमधून शेअर्स विक्री केली जात आहे. थोडक्यात, बाजारातून पैसा काढून घेतला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post