रंगरंगोटी देखाव्यासाठी कोट्यावधीची उधळपट्टी

 झोपडपट्ट्यात सुविधांचा अभाव .... बाबा कांबळे


प्रेस मीडिया ऑनलाईन : 

पुणे जिल्हा प्रतिनिधी : पठाण एम एस


पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील झोपडपट्टीवासीय विविध समस्यांनी हैराण असून त्या सोडविणे आवश्यक आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध ठिकाणी सुमारे २ कोटी रुपये खर्च करून रंगरंगोटीची कामे करण्यात येत आहेत. झोपडपट्टीच्या समस्या तशाच ठेऊन शहरात रंगरंगोटी करून महापालिका सत्ताधारी आणि अधिकारी झोपड्पट्टीवासियांची थट्टा करत असल्याचा आरोप, कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केला. झोपडपट्टीच्या हजारो समस्या सोडविण्याऐवजी रंगरंगोटीवर सत्ताधारी खर्च करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.


अनेक समस्यांनी झोपडट्टीमधील नागरिक त्रस्त आहेत. त्या सोडविण्याचे तर दुरच उलट महापालिका नको त्या योजनांवर खर्च करत आहे. सध्या पिंपरी-चिंचवड महापालिका रंगरंगोटीच्या नावाखाली झोपडपट्टीमधील नागरिकांची थट्टा करत आहे. सध्या स्वच्छ भारत अभियाणांतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून रंगरंगोटी करण्याचा दिखावा सुरु आहे. वरून शहर स्वच्छ दिसेल मात्र झोपड्पट्टीमधील समस्याकडे दुर्लक्ष होणार हे चित्र आहे. आयुक्त राजेश पाटील आणि झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्त आण्णा बोदडे देखील अशी कामे मंजूर करून चुकीच्या कामांना खतपाणी घालत असल्याचा आरोप कांबळे यांनी केला.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील झोपडपट्टीवासीय विविध समस्यांनी हैराण झाले आहेत. झोपडपट्टीमध्ये दूषित पाणी, सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, कचरा कुंडी ,तुंबलेले नाले, सार्वजनिक ठिकाणी शौचालय, भटके कुत्रे, बहुतेक ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन मधून पाणी गळती,आणि एक दिवसा आड पाणी पुरवठा, आदी समस्या मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या आहेत. त्या सोडविण्याकडे महापालिका सत्ताधारी आणि अधिकारी उदासीन दिसत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधी रुपयांच्या कामाला विनाकारण परवानगी दिली जात आहे. पिंपरीतील रंगरंगोटी केलेल्या टिपू सुलताननगर येथे पाहणी केली. या वेळी येथील नागरीकांनी समस्यांचे गाऱ्हाणे डोंगरच मांडले. या परिसरात सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. दरवाजे निखळून पडले असल्याने महिलांची व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तुंबलेले नाले काढण्याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करत आहे. ड्रेनेज तुंबलेले असून त्यामधून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर येत आहे. त्यामुळे साथीचे आजार या परिसरात वाढण्याची भीती निर्माण झालेली आहे.

 अशा परिस्थितीत सत्ताधारी आणि अधिकारी नको त्या ठिकाणी पैशाची उधळपट्टी करत आहे देखावा कोणासाठी होत आहे, काय लपवायचा प्रयत्न होत आहे . नागरिकांच्या समस्या आणि मूलभूत गरजा याकडे दुर्लक्ष करून रंगरंगोटी करणे  हे तर भिताड बांधून गरिबीला लपवण्या सारख आहे,असे आरोप नागरिक करत आहे,

महाराष्ट्र मजूर पक्षाचे अध्यक्ष भाऊसाहेब आडगळे, बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध, भिमशाही युवा संघटनेचे अध्यक्ष शिवशंकर उबाळे, बळीराम काकडे, सदाशिव तळेकर, अनिता सावळे, गौरी शेलार आदीसह विविध संघटनेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी होतील, अशी माहिती बाबा कांबळे यांनी दिली.




जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क पिंपरी चिंचवड प्रतिनिधी पठाण एम एस 94232 49331

Post a Comment

Previous Post Next Post