29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

 


प्रेस मीडिया ऑनलाइन :

शिवकुमार मुरतुले सर :

इचलकरंजी : वीरशैव लिंगायत नागलिक (बणगार) उत्कर्ष मंडळाचे 29 वी *वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न* खोतवाडी, गौरी शंकर नगर येथील श्री दानम्मा देवी व श्री वीरभद्र मंदिराच्या सांस्कृतिक हॉलमध्ये संपन्न झाली. सर्व सभासद बंधू भगिनींचे व मंडळाच्या अध्यक्ष व संचालकांचे मान्यवर पाहुण्यांचे स्वागत श्री.इराण्णा चचडी यांनी केले.या नंतर मान्यवरांच्या शुभहस्ते बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीपप्रज्वलन करण्यात आले.

समाजातील व देशसेवा करणारे सैनिक तसेच कोरोना महामारी मध्ये रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, नर्स व पोलीस कर्मचारी इत्यादी मान्यवरांसाठी श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.स्टेज वरील सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.



29 चा वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक व मान्यवरांची ओळख श्री शिवकुमार मोरे सर यांनी केले. प्रथम त्यांनी श्री दानेश्वरी विरभद्र मंदिरात नतमस्तक होऊन प्रास्ताविका सुरुवात केली व्यासपीठावर मान्यवर व सभासद बंधू भगिनींचे स्वागत केले. मंडळाची सुरुवात 1992 साली स्थापन झाली संस्थापक अध्यक्ष कै. सदाशिव वरदाई यांनी याचे छोटेशे रोपटे लावले याचं वटवृक्ष होताना आपण पाहत आहोत. यानंतर 2003 साली महिला मंडळाची स्थापना करण्यात आली 2009 सली मंदिराची जागा श्री.इराण्णा मट्टिकल्ली यांच्या अथक प्रयत्नातून हाजी कै.राजूभाई पाथरवट यांनी सहा गुंठे जागा खोतवाडी येथे दिली या ठिकाणी श्री.वीरभद्र व श्री.दानेश्वरी मंदिराची स्थापना करण्यात आली यानंतर युवक मंडळाची स्थापना करण्यात आली रक्तदान शिबीर घेण्यात आले, पूरग्रस्तांना मदत करण्यात आली, महिलादिन, बसवेश्वर जयंती, श्रावण मास अखंड अभिषेक, दसरा महोत्सव, सीमोल्लंघन, मंदिराचा वर्धापन दिन, श्री दानेश्वरी देवीची यात्रा, श्री विरभद्र देवाची यात्रा, वाढदिवस साजरे करणे, वृक्षारोपण करणे, बचत गट, प्रत्येक अमावस्येस महाप्रसाद इत्यादी उपक्रम व्यवस्थित येते आपला समाजाच्या वतीने चालू आहेत. या कार्यक्रमास उपस्थित असलेले अखिल भारतीय वीरशैव बणगार समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब देवनाळ तसेच  श्री दानम्मा देवी व श्री वीरभद्र मंदिराचे भक्त उद्योजक बाळासाहेब सुतार यांचा थोडक्यात परिचय करून दिला.

यानंतर सन 2020 व 2021 या सालातील जमा-खर्चाचे अहवाल वाचन मंडळाचे सेक्रेटरी श्री इराण्णा मट्टीकल्ली यांनी वाचून दाखवले.

व आहवाल सालामध्ये आपल्या समाजातील इयत्ता दहावी व इयत्ता बारावी मध्ये उज्वल यश मिळवल्याबद्दल तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सर्व मुलांचा स्टेजवरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच श्री बाळासाहेब देवनाळ यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल समाजाच्या वतीने मानपत्र देऊन सत्कार करण्यात आले. तसेच श्री शिवकुमार मुरतले सर यांना महाराष्ट्र गोवा एकता पुरस्कार मिळाल्याबद्दल व सौ राखी मुरतले मॅडम यांना सावित्रीबाई फुले यांचा अविष्कार फाउंडेशनचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मंडळाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

यानंतर उद्योजक श्री बाळासाहेब सुतार यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी मंदिरा करिता सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.

श्री बाळासाहेब देवनाळ यांनी आपल्या मनोगतामध्ये मंदिरात जागा अपुरी पडत असून ते वरील बाजूस बांधकाम करून वाढवण्याची इच्छा व्यक्त केली.

शेवटी अध्यक्ष भाषणामध्ये मंडळाचे उपाध्यक्ष श्री शिवकुमार मुरतले सर यांनी 12 व्या शतकातील श्री बसवेश्वर यांच्या कार्याची महती सांगितली अनुभव मंडपाची संकल्पना सांगितली स्त्री पुरुष समानता. व परिवर्तन हे एकट्याने होत नसून सर्वांनी काम केल्यानंतर होऊ शकते याच एक छोटीशी गोष्ट सांगितली. मंदिराच्या वाढीव बांधकामासाठी सर्व समाज बांधवांना आव्हान केले. मंदिरासाठी एंप्म्लीफायर दिल्याबद्दल अण्णासाहेब कमते. व ज्योत्ना आमटे यांनी 12 खुर्च्या दिल्याबद्दल त्यांचे मंडळाच्या वतीने अभिनंदन केले. एकत्र या एकीचे फळ समाजामध्ये देणारे दानशूर भरपूर आहेत आपण फक्त त्यांच्या पर्यंत पोचण्याची गरज आहे. या कार्याकरिता सर्वांनी एकत्र यावे यासाठी द्राक्षाच्या घडाचे उदाहरण व सुट्ट्या द्राक्षाच्या मणी याचे उदाहरण देऊन सांगितले. एकत्र आल्यानंतर त्याची किंमत वाढते हे उदाहरणासह स्पष्ट केले व आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

शेवटी आभाराचे गोड कार्य मंडळाची संचालक श्री इराण्णा चचडी यांनी केले व सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन करणाऱ्या सौ राखी मुरतले तसेच सर्व मान्यवरांचे समाजातील बंधू भगिनींचे पुजारी ऑंटी व पुजारी काका यांचे आभार मानले.

व शेवटी सर्व सभासदांना व उपस्थितांची जेवणाची व्यवस्था करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post