चोरीची रिक्षा रात्री चालवत असे व दिवसा लपून ठेवत असे.
प्रेस मीडिया ऑनलाइन :
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली :
पिंपरी चिंचवड : चोरीची रिक्षा रात्री चालवणाऱ्या पोलिसांनी एका रिक्षा चोराला सापळा रचून अटक केली आहे. पोलिसांनी पकडू नये म्हणून फक्त रात्रीच्या वेळी चोरीची रिक्षा चालवत होता. मात्र रिक्षाच्या मूळ मालकाने या बाबत पोलिसात तक्रार दिली होती व एका संघटनेत ही बाब कळवली होती , संघटनेतील एका रिक्षा चालकाला रिक्षा चाकण-मोशी मार्गावर दिसली. त्यानंतर एका वाहतूक पोलिसाच्या मदतीने ती रिक्षा पकडण्यात यश आले.
रोषण प्रकाश नरवडे रा. नाणेकरवाडी, चाकण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रदीप बापू डोलारे वय २९ रा. चिंचवड स्टेशन यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोलारे यांनी ५६ हजारांचे कर्ज काढून दहा महिन्यांपूर्वी नवीन रिक्षा खरेदी केली होती. गुरूवारी मध्यरात्री अडीच ते सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान आरोपी नरवडे याने फिर्यादी डोलारे यांची दीड लाख रुपये किंमतीची रिक्षा (एम एच 14 / एच एम 9932) चोरून नेली.
आरोपी नरवडे याने मध्यरात्री रिक्षा हॅन्डल लॉक तोडून रिक्षा चोरून नेली. चोरीची रिक्षा ओळखायला येऊ नये म्हणून त्यावरील रेडिअम काढून नवीन नाव टाकले. तसेच रिक्षाचे हुडही बदलले. त्यानंतर तो चोरीची रिक्षा चाकण-मोशी मार्गावर फक्त रात्रीच्या वेळी चालवू लागला. रात्रीच्या वेळी आपल्याला पोलीस पकडू शकणार नाहीत, असा त्याने विचार केला.
रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास गोडाऊन चौक, मोशी येथे त्यांना डोलारे यांची रिक्षा चालू असल्याची माहिती मिळताच वाहतूक पोलीस राक्षे यांनी रिक्षा चालकाला सापळा रचून थांबण्यास सांगितले. मात्र पोलिसांना पाहून तो पळू लागला. त्यावेळी राक्षे यांनी रिक्षावरील एक हजार ७०० रुपयांचा दंड भरण्यास सांगितले.
आपली चोरी उघड झाली नाही, असे वाटल्याने आरोपी रिक्षा चालक नरवडे हा थांबला. वाहतूक पोलीस राक्षे यांनी त्याला एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात आणले. तिथे गेल्यावर पोलिसांनी चौकशी केली असता त्याने रिक्षा चोरल्याची कबुली दिली.