खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा

 नवी मुंबईत चार दिवसात तब्बल 1390 पोलिसांना कोरोना.



 प्रेस मीडिया ऑनलाइन :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी  : सुनील पाटील  

राज्यात सध्या कोरोना च्या तिसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे राज्यातली रोजची रुग्णसंख्या पुन्हा 40 हजाराच्या पुढे गेली आहे लोकांच्या सुरक्षेसाठी रात्रदिवस तय नात असणारय्या कोरोना काळात तुमच्या आमच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या खाखी वर दिला आहे कोरोनाचा प्रादुर्भाव नवी मुंबईतील वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात झाला आहेचार दिवसात 180 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 1210 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीय. एकूण 1390 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 30 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मुंबईतल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्युही झाल्याचे समोर आले आहे.

         खाकीला कोरोनाचा मोठा फटका

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेळी 15 अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर 186 अधिकारी आणि 1243 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली. दरम्यान, नवी मुंबई शहर पेालीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंतेची वातावरण आहे. त्याच दरम्यान, गेल्या चार दिवसात ज्या पोलिसांना कोरोना झाला आहे त्यातील काही जणांवर विविध रुग्णालयांमध्ये तर इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गृहविलगीकरणात उपचार करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपयुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली. पोलीस आयुक्तालयात चिंतेचे वातावरण आहे.

नवी मुंबईत गेल्या 24 तासांत 2 हजार 337 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 316 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बातमी असे आहे कि कोरोनामुळे एक हि मृत्यू नाही . सध्या नवी मुंबईत अॅक्टिव्ह रुग्ण 11147 आहे . तर नवी मुंबई मध्ये दिवसात रुग्ण दुपट संख्यने वाढत आहे, त्यामुळे नवी मुंबई पालिका बंद असलेली ऑक्सिजन बेड कोविड सेंटर पुन्हा सुरू केली आहेत. कायदा आणि सुव्यस्था राखण्यासाठी पोलिसांना घराच्या बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही, मात्र त्यामुळेच खाकी पुन्हा कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे, फक्त कर्मचाऱ्यांचा नाही तर त्यांच्या कुटुंबियांचाही धोका यामुळे वाढला आहे.

       


सुनील पाटील : 8530838712

जाहिरातीसाठी व बातम्यांसाठी संपर्क साधा

Post a Comment

Previous Post Next Post