प्रेस मीडिया ऑनलाईन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :पठाण एम एस
आत्महत्येची पहिली घटना भोसरी परिसरात घडली. सुपदाजी हरिभाऊ तायडे वय २७, रा. सदगुरूनगर, भोसरी यांनी शनिवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेतला. त्यांना दारूचे व्यसन असल्याचे पोलिसांनी सांगितले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
आत्महत्येची दुसरी घटना चिखली परिसरात उघडकीस आली. शुभम हरदिास इंगळे वय 19, रा. चिखली असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील असून शहरात तो मोलमजुरीचे काम करीत होता. शनिवारी रात्री त्याचा सहकारी जेवण करण्यासाठी गेला असता त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
आत्महत्येची तिसरी घटना देहू येथे घडली. कल्पना निरंजन सरदार वय २६, रा. देहूगाव असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. कल्पना यांना दुर्धर आजार होता. या आजारपणाला कंटाळून त्यांनी राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
आत्महत्येची चौथी घटना मोशी परिसरात घडली. प्रशांत रखमाजी माटे वय ४३, रा. मोशी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने विषारी औषध प्राशन केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.