जातीनिहाय जनगणना । भुमिहिन गरिबांनो जागते रहो

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

अनु जाती व अनु जमातीची जातीनिहाय जनगणना हि दर दहा वर्षीनी होतच असते आताची जातीनिहाय जनगणना हि भारतातील सर्व जाती ची जनगणना असणार आहे . भारतातील कोणत्या जाती सामाजिक शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या आहेत याचा सर्व्हे या जातीनिहाय जनगणनेत होणार आहे . हि जातीनिहाय जनगणना केन्द्र सरकार च्या गृह विभाग च्या आदेशाने ग्रामविकास विभाग च्या मदतीने होईल . प्रगणक प्रत्येक घरोघरी मोबाईल टॅब च्या सहाय्याने तो सर्व्हे करेल . त्यात प्रत्येक नागरीकांने प्रगणकाला स्वतः च्या जातीची माहिती तसेचे त्याचे सामाजिक मागासलेपण शैक्षणिक मागसलेपण आर्थिक मागसले पणाची माहिती द्यावयाची असते हि एक सुवर्ण संधी आहे कि आपण सध्या कोणत्या स्तरात जिवन जगत आहोत हे शासन दरबारी कायदेशीररित्या नोंद होणार आहे .

पण भारत देश स्वातंत्र झाल्या पासुन SC / ST ची जातीनिहाय जनगणना हि प्रत्येक दहा वर्षी नी होत असते व त्याचा डाटा हा पूर्वीचे प्लॅनिंग कमिशन व आत्ताचे निति आयोग या कडे पाठीवाला जात असे .

जेव्हा प्रगणक आपल्या दारी यायचा व काही प्रश्न विचारायचा तेव्हा आपली मानसं त्या प्रगणकला चुकीची माहिती देत असत तर काही प्रगणक खोडसाळ पणे प्रत्यक्षदर्षी समोर ची व्यक्ती गरीब सामाजिक दुष्टया मागास शैक्षणिक दुष्टया मागास गवताच्या कुडाच्या घरात राहत असताना त्याला कागदोपत्री बंगल्यात दाखवणे घरात फ्रीज फोर व्हीलर दाखवणे सर्व सुख सुविधा उपभोक्ता दाखवणे चांगल्या प्रतिचे कपडे आहार उपभोग घेतात असे नमुद करून संबंधीत S C /ST समाजाला शासकीय लाभा पासुन अलिप्त ठेवण्याचा प्रकार प्रगणकाच्या जातीद्वेष्यामुळे गेल्या अनेक दशकात झाले आहे . आणि त्याचे गंभीर परिणाम म्हणजे शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून SC / ST समाजाला वंचित राहावे लागले आहे .

आज आपणाला प्रगणक जातीनिहाय जनगणना करिता आपल्या दारात आला तर शेतीकरिता शेत जमिनीच्या प्रश्नावर आपण भुमिहिन असलातर प्रथम आपले कुटुंब भुमिहिन असल्याचे नमुद करा धर्मांतरीत बौद्धासाठी जात या कॉलम मध्ये तुम्हीची पूर्वाश्रमीची जात (उदा . महार ) व धर्म या कॉलम मध्ये धर्मांतरीत बौद्ध असे नमुद करावे

त्यानंतर कुंटुबातील कोणत्या व्यक्तीने शैक्षणीक नोकरी अथवा राजकीय आरक्षणाचा लाभ घेतला आहे काय असा प्रश्न प्रगणकाने विचारल्यास खरोखर च लाभ घेतला असेल तरच लाभ घेतला आहे असे सांगा नाहीतर मला व माझ्या कुंटुंबातील कोणत्याही व्यक्ती ने आरक्षणाचा लाभ घेतला नाही असे नमुद करा . तसेच आपण राहत असलेले घर निकृष्ट ,आहार ' कपडे ,राहाणीमान ,शैक्षणीक स्थिती , बेरोजगारी , सामाजिक मागासलेपणा , घरात चुली वरचे स्वयंपाक , टु व्हीलर , फोर व्हीलर ,फ्रीज , वाशिंग मशिन या सारख्या भौतिक सुविधांच्या प्रश्नावर योग्य उत्तरे दया अथवा आपली काही मानसे बडेजावपणा चे उत्तरे प्रगणकाला देत्तात व शासनाचा अनेक लाभा पासून अलिप्त राहतात त्यामुळे आज भारतातील सर्व गरीब मागास अतिमागास कुटुंबाना आपल्या . गरीबीवर मात करण्याची सुर्वण संधी या जातीनिहाय जनगणनेमुळे होणार आहे . भारताची जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर तो डाटा निति आयोगा कडे जाणार आहे आणि त्यातून अनेक योजनांची व निधिची खैरात होणार आहे त्यातून पक्के घरे , हक्काचे आरक्षण , सामाजिक प्रतिष्ठा व शासकीय नोकऱ्यां व मुलभुत सुविधा केन्द्र सरकार उपलब्ध करून देणार आहे . त्यामुळे देशातील गरिबांनो जागते रहो !

🔳संतोष एस आठवले

▪️9860015333

Post a Comment

Previous Post Next Post