या काळया विधेयकाला विरोध करत विद्यार्थी बांधवांना सोबत घेऊन १० लाख पत्र भारतीय जनता युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना पाठविणार आहे.
प्रेस मीडिया ऑनलाइन :
विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारे विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) महविकास आघाडी सरकारने मुद्दाम घाई घाईने पारित करून घेतले.या माध्यमातून प्र.कुलपती हे नवीन पद तयार करून कुलपतींचे अधिकार उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना दिले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या राखरांगोळी करणारे काळे विधेयक महाविकास आघाडी सरकारने हिवाळी अधिवेशनात घाईघाईत रेटून नेले. कुलपती वर्षानुवर्ष ही यंत्रणा हाताळत होते त्यांचे आधिकार कमी करून ते अधिकारी शिक्षणमंत्र्यांना दिले जाणार आणि शिक्षकांना प्र. कुलपतीचा दर्ज दिला जाणार आहे. भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार राज्यातून समोर आले. भ्रष्टाचारातील अटक होणाऱ्यांची मालिका अद्याप सुरू आहे आणि सरकारला विद्यापिठचा विषय हातात घेऊन त्यातील आर्थिक मलिदा लाटायचा अशी यांची भावना आहे, अशी टीका भाजपच्या विक्रांत पाटील यांनी केली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे विद्यापिठातही भ्रष्टाचार सुरू होईल. ज्या पद्धतीने इतर परीक्षात भ्रष्टाचार झाले भविष्यात हे डिग्री देखील विकतील. कुलपती कुलगुरूंची निवड करायचे आता कुलगुरुंची निवड शिक्षणमंत्री करणार आणि कुलगुरूंच्या निवडीसाठी आर्थिक रॉकेट तयार होईल. हेच कुलगुरू बाबूगिरीमध्ये अडकणार. याचा परिणाम विद्यार्थी आणि प्राध्यापकांना भोगावे लागतील. त्यामुळे या काळ्या कायद्याचा निषेध आहे आणि या निषेधात अनेक विद्यार्थ्यांची आम्हाला साथ आहे, असे विक्रांत पाटील यांनी म्हटले आहे.