आयुष्यात स्वतःशी प्रामाणिक राहून केलेल्या प्रयत्नातून व कष्टातून मिळालेलं यश

               खरी कमाई...!

प्रेस मीडिया ऑनलाइन :

इचलकरंजी : आयुष्यात स्वतःशी प्रामाणिक राहून केलेल्या प्रयत्नातून व कष्टातून मिळालेलं यश हे शाश्वत समाधान व आनंद देणारं असतं..त्याचं मुल्य पैशानं मिळवलेल्या कोणत्याच भौतिक सुखाच्या गोष्टीतून करता येत नाही...पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत राहताना आजपर्यंतच्या निरपेक्ष कार्याची विविध संस्था व संघटनांनी दखल घेवून मला पुरस्कार देवून सन्मानित केले...या मध्ये २०१५ साली ठाण्यातील क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचा आदर्श लेखणी पुरस्कार ,२०१६ साली इचलकरंजीच्या श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ,२०१७ साली इचलकरंजीच्या वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्थेचा आदर्श लेखणी पुरस्कार आणि २०१८ साली सामाजिक कार्याबद्दल नगरपालिकेच्या हुतात्मा बाबू गेनू विद्या मंदिरच्या कर्तव्यनिष्ठ आदर्श शिक्षिका सौ.वसुधा गुरव यांच्यावतीने छत्रपती शिवरायांची प्रतिमा देवून सन्मान यांचा समावेश आहे...हे सारं माझ्यासाठी भविष्यात चांगलं कार्य करण्याची प्रेरणा देणारं आहे... अन् यातून मिळालेली ओळख हीच माझी आयुष्याची खरी कमाई आहे ,अशी माझी प्रांजळ भावना आहे...हे सारं वैभव अनुभवणं हा देखील स्वतःच्या आयुष्याचा लेखाजोखाच म्हणावा लागेल...घरात दर्शनी भागात असलेल्या या वैभवाकडे दररोज पाहताना मनात सकारात्मक भाव निर्माण होवून विधायक कार्याची प्रेरणा मिळत राहते...हा नित्याचा अनुभव आता चांगल्या कार्याच्या आठवणींना उजाळा देणारा असला तरी अजूनही आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे ,याची जाणीव करुन देणारा आहे... हेही तितकंच खरं आहे... यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद ,शुभेच्छा कायम पाठिशी राहोत ,हीच माफक अपेक्षा...!


- सागर बाणदार

Post a Comment

Previous Post Next Post