सोमवार पासून संपूर्ण राज्यभरात नव्याने निर्बंध लागू

रविवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून राज्‍यात नवे नियम लागू करण्यात येणार आहे.


प्रेस मीडिया ऑनलाइन :

 पुणे शहर प्रतिनिधी : जीलानी ( मुन्ना ) शेख :

पुणे :  राज्यात पुन्हा एकदा मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्यामुळे प्रशासनाने कठोर निर्णय घेतला आहे. येत्या सोमवार पासून संपूर्ण राज्यभरात नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत.स्विमिंग पूल, जीम, स्पा पूर्णपणे बंद, तर शाळा कॉलेजही 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदाने, उद्याने, चित्रपटगृह, केश कर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे.

रविवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून राज्‍यात नवे नियम लागू करण्यात येणार आहे.

:- सकाळी 5 ते रात्री11 राज्‍यात जमावबंदी लागू

:- रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्‍यात नाईट कर्फ्यू (संचारबंदी)

:- मैदाने उद्‍याने पर्यटन स्‍थळे बंद राहणार

:- रेस्‍टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे 50 टक्‍के क्षमतेने रात्री 10 पर्यंत सुरू राहणार

:- 2 डोस पूर्ण झालेल्‍यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेता येणार

:- राज्‍यातील शाळा आणि कॉलेजेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार

:- खासगी कंपन्यांमध्ये 2 डोस घेतलेल्‍यांनाच परवानगी

:- खासगी कार्यालये 50 टक्‍के क्षमतेने सुरू राहतील
लग्‍नासाठी 50 तर अंत्‍यसंस्‍कारासाठी 20 लोकांनाच परवानगी

:- हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

:- लग्‍न समारंभांसाठी 50 तर अंत्‍यसंस्‍कारासाठी 20 लोकांनाच परवानगी

PRESS MEDIA

Chief Editor: Mehabub Sarjekhan

Post a Comment

Previous Post Next Post