तक्रारदार महिलेकडेच तब्बल 50 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी

 भाजपचे  सुधीर रामचंद्र आल्हाट याला अटक.


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

जिलानी (मुन्ना ) शेख :

पुणे :  विरोधातील तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी तक्रारदार महिलेकडेच तब्बल 50 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे शिवाजीनगर माजी अध्यक्ष शहराध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर रामचंद्र आल्हाट याला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

याप्रकरणी सुभाष उर्फ अण्णा जेऊर, निलेश जगताप, विवेक कोंडे यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूडमधील महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल होता. त्या गुन्हयाबाबत फिर्यादी महिलेने आल्हाट याच्याशी संपर्क साधून मदतीची मागणी केली होती. त्यावेळी आल्हाटने डेक्कन पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे यांच्या विरुध्द तक्रारी अर्ज करा असे सांगितले होते. माझ्या पोलीस खात्यात मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांसोबत ओळखी आहेत, मी आत्तापर्यंत 32 अधिकारी निलंबित केलेले असल्याचे त्याने तक्रारदार महिलेला सांगितले होते.

सदर महिलेला आल्हाट याने पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांच्याविरुध्द भारतीय जनता पक्षाच्या लेटरहेडवर अर्ज करण्यास भाग पाडले. त्यानंतर आल्हाट यांनी फिर्यादी महिलेला घरी बोलावून या प्रकरणी 50 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. मला पैसे दिले तरच तुम्ही पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे आणि पालवे यांच्याविरुध्द केलेले अर्ज मागे घेवू देईन असे आल्हाट याने महिलेला धमकावले होते. असं न केल्यास तुम्हाला पण लटकावेन, जीवे मारुन टाकीन अशी धमकी आल्हाट याने आपल्याला दिल्याची तक्रार महिलेने केली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी सुधीर आल्हाट यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post