तळेगाव मध्ये मुलाच्या डोक्यात गोळी झाडून त्याची हत्या केल्याची घटना मध्य रात्रीच्या सुमारास घडलीय

दशांतची हत्या का करण्यात आली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही .

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

मावळ प्रतिनिधी : पठाण एम एस

तळेगाव मध्ये १७ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे . या मुलाच्या डोक्यात गोळी झाडून त्याची हत्या केल्याची घटना मध्य रात्रीच्या सुमारास घडलीय . या घटनेमुळे तळेगाव मध्ये एकच खळबळ उडाली असून अज्ञात आरोपीचा शोध तळेगाव पोलीस घेत आहेत . ही घटना रात्री बाराच्या सुमारास घडली आहे . दशांत अनिल परदेशी असं खून झालेल्या मुलाचं नाव आहे . दशांतची हत्या का करण्यात आली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही . दशांतचे वडील अनिल परदेशी यांनी याबाबत तळेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , रात्री उशिरा दशांत हा दुचाकी घेऊन घराबाहेर पडला होता . त्यानंतर तो घरीच आला नाही . त्यामुळं त्याचा शोध घरातील व्यक्ती आणि नातेवाईक घेत होते . दशांत शोध घेत असताना नॅशनल हेवी कंपनी येथे त्याचा मृतदेह आढळला आहे . त्याच्या डोक्यात गोळी झाडण्यात आल्याचं दिसून आलं . हा हत्येचा प्रकार असल्याची माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे . विशेष म्हणजे ही घटना तळेगाव पोलीस ठाण्याच्या काही मीटर अंतरावर घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत . दशांतची हत्या करणाऱ्यांचा शोध तळेगाव पोलीस घेत आहेत . दशांतच्या डोक्यात अगदी जवळून गोळी झाडण्यात आल्याचं प्रथम दर्शनी स्पष्ट होत असल्याने त्याची हत्या कोणी केला यासंदर्भातील गूढ वाढलंय . तरुणाच्या डोक्याच्या डाव्या बाजूने गोळी झाडण्यात आली असून ती डोक्याच्या आरपार गेलीय . गोळी अगदी जवळून झाल्याने हत्या करणारी व्यक्ती या तरुणाच्या ओळखीची असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय .पुढील तपास तळेगांव पोलिस करत आहे.


जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क: 

 मावळ प्रतिनिधी पठाण एम एस : +91 94232 49331*

Post a Comment

Previous Post Next Post