निगडी येथील शिधापत्रिका कार्यालयात

 स्वयंघोषणापत्र स्विकारणे तसेच कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती स्विकारण्याबाबत अंमलबजावणी


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख : 

पिंपरी चिंचवड निगडी येथील शिधापत्रिका कार्यालयात शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर शपथ पत्र घेण्याऐवजी स्वयं घोषणापत्र स्विकारणे तसेच कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती स्विकारण्याबाबत अंमलबजावणी करण्यात येत आहे . त्याबाबतच्या निर्णयाची प्रत दिनेश तावरे साहेब  ( परिमंडळ अधिकारी अ विभाग चिंचवड )यांच्या कार्यालयाच्या  दर्शनी भागावर  लावण्यात आली आहे . 

निगडी व देहूरोड परिसरातील नागरिकांनी दिनेश तावरे ( परिमंडळ अधिकारी अ विभाग चिंचवड ) यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे कोणत्याही सरकारी कामकाजासाठी शपथपत्र सादर करताना शंभर रुपयांचा (Stamp paper) स्टॅम्प पेपर बंधनकारक नसतानाही राज्यभर विविध सरकारी कार्यालयांतून स्टॅम्प पेपरची सक्ती केली जात असल्याच्या नेहमी च आपल्या पाहायला मिळते.

सरकारी कार्यालयात सादर करायच्या प्रतिज्ञापत्रांसाठी शंभर रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ केलेले आहे. 2004 पासून सरकारी कार्यालयात सादर करायचे कोणतेही प्रतिज्ञापत्र साध्या कागदावर करता येते. याबाबत सरकारने गेल्या 17 वर्षांत वेळोवेळी शासकीय परिपत्रके काढली आहेत.



*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post