तळोजे मजकूर येथे सांगितिक सप्ताह; प. पु. योगिराज यशवंत महाराज, रायगड भूषण पंडित उमेश चौधरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने प्रारंभ .




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

 प. पु. सदगुरु वामनबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तळोजे मजकूर येथे श्री. दत्तजयंती सप्ताहानिमित्त दररोज श्री गुरुचरित्राचे पारायण व भगवतधर्म सांप्रदायातील थोर विचारवंतांची किर्तने व महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांची भजनादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

          या सोहळ्याचे उदघाटन प. पु. योगिराज यशवंत महाराज तसेच सांस्कृतिक सेलचे पनवेल तालुका अध्यक्ष रायगड भूषण पंडित उमेश चौधरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ह. भ. प. कर्वे सर, ह. भ. प. संतोषबुवा पाटील, ह. भ. प. अशोक पाटील, तबलावादक निषाद पवार, सोमनाथ पाटील, आदित्य पाटील आदी उपस्थित होते. 

दररोज होणाऱ्या कार्यक्रमात ह. भ. प. संदीप महाराज शिंदे (हासेगावकर), ह. भ. प. किशोर महाराज खरात (सिन्नर), ह. भ. प. विश्वनाथ महाराज वारिंगे (पाले), या महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची किर्तने तसेच पंडित उमेश चौधरी, पंडित नागेश आडगावकर, सुरमणी भाग्यश्री देशपांडे, सारेगमप फेम महेश कंठे, गणेश गोंधळी या नामवंत गायक-गायिकांचे शास्त्रीय भजनाचा रसिक श्रोत्यांना श्रवणाचा लाभ मिळणार आहे. या सर्व कार्यक्रम सप्ताहाचे जास्तीत जास्त भक्तगणांनी लाभ घ्यावा, असे आयोजक ह. भ. प. कैवारी पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post