आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पुलाच्या कामाचे भूमिपूजन; १० कोटी ११ लाख रुपये खर्चाचा महत्वपूर्ण पूल..
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व सातत्यपुर्ण प्रयत्नातून गाढी नदीवरील देवद - सुकापूर, नवीन पनवेल येथे उभारण्यात येत असलेल्या महत्वपूर्ण पुलाच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संप्पन्न झाले.
सुकापूर येथील गंगा गणेश सोसायटीजवळील गणेश विर्सजन घाटाजवळ झालेल्या भूमिपूजन सोहळ्याला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पनवेल महापालिकेचे नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, प्रभाग समिती सभापती सुशिला घरत, नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, युवा मोर्चा ग्रामीण अध्यक्ष आनंद ढवळे, सुकापूर सरपंच योगिता पाटील, देवद सरपंच शीतल सोनावणे, ज्येष्ठ कार्यकर्ते वामन म्हात्रे, अॅड. जितेंद्र वाघमारे, माजी उपसरपंच बुवा भगत, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, ज्ञानेश्वर पाटील, युवा नेते यतीन पाटील, सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, सरचिटणीस उदय म्हस्कर, महेश केणी, युवा मोर्चाचे आत्माराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, दिनेश भगत, पुष्पा म्हस्कर, अनिता पाटील, पूनम भगत, कविता पोपेटा, ज्योती केणी, विनोद वाघमारे, दिनेश वाघमारे, युवा नेते संदीप वाघमारे, निलेश वाघमारे, अविनाश गायकवाड, प्रमोद भगत, दीपक भगत, साजीद सय्यद आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पनवेल शहर व आजूबाजूच्या परिसरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने देवद ठिकाणी लोकवस्ती विकसित होत आहे. त्या अनुषंगाने वाढते नागरीकरण आणि वाहतूक यांचा विचार करता या गावात जाण्यासाठी गाढी नदीवरील असलेला पूल जीर्ण झाल्याने या ठिकाणी नवीन आणि रुंद पूल निर्माण करण्याची मागणी सर्वप्रथम आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे करत सततचा पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी करतानाच या पुलाची आवश्यकता त्यांच्या लक्षात आणून दिली होती. आणि त्यानुसार या पुलाच्या कामासंदर्भात पत्रव्यवहार व बैठका घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, एमएमआरडीए यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यानुसार देवद पुलाच्या कामाला मंजुरी व कार्यादेश मिळाला आहे. या कामासाठी १० कोटी ११ लाख ४४ हजार रुपये खर्च येणार असून आरसीसी प्रकारचे हे काम १८ महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश कार्यादेशानुसार ठेकेदाराला देण्यात आला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे वचनपूर्ती करण्यात आल्याने देवद, सुकापूर व परिसरातील नागरिकांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार व्यक्त केले जात आहे.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, प्रकल्पाच्या सुरुवातीबरोबर येणार्या कालावधीमध्ये सिडको आणि नैनाने जर सकारात्मक भूमिका घेतली, तर परिसरातील नागरिक या नियोजनबद्ध विकासाला प्रतिसाद देतील. तसेच नागरिकांच्या विकासकामांबाबत सिडकोबरोबर चर्चा करू आणि गरज भासली, तर संघर्ष करून परिसराच्या, नागरिकांच्या हितासाठी काम करावे लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून या परिसरातील नागरिकांचे पाठबळ लाभेल, अशी खात्रीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी