तीर्थक्षेत्र देहू नगरीत आज केवळ 13 जागांसाठी मतदान झाले 75% मतदान झाले


 

  प्रेस मीडिया वृत्तसेवा :

   मावळ प्रतिनिधी : पठाण एम एस

देहू नगरी तीर्थक्षेत्र देहूगाव नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज पार पडल्या (मंगळवारी) मतदान झाले.  74.97 टक्के मतदान झाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 59 टक्के मतदान झाले. आज केवळ 13 जागांसाठी मतदान झाले. ओबीसींच्या राखावी 4 जागांवर खुल्या प्रवर्गातून 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार आहे. सर्व जागांची 19 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

देहू नगरपंचायतींच्या 17 प्रभागासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने प्रभाग 11,12, 14 आणि 15 मधील निवडणूकही स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आज 13 जागांसाठी मतदान झाले. देहू नगरपंचायतीच्या 13 प्रभागातून 48 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 13, भाजपा 13, शिवसेना 8, तर काँग्रेसचे 5 उमेदवार असून 9 अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

नगरपंचायतीसाठी सकाळी साडे सात ते साडे नऊ या पहिल्या दोन तासात 13 टक्के मतदान झाले. साडेअकरा वाजेपर्यंत 28 टक्के, दीड वाजेपर्यंत 45 टक्के आणि साडेतीन वाजेपर्यंत 59 टक्के आणि सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 5 हजार 649 पुरुष तर 5 हजार 168 महिला अशा 10 हजार 817 जणांनी मतदानाचा हक्क बजाविला. आज एकूण 74.97 टक्के मतदान झाले.



*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क मावळ प्रतिनिधी पठाण एम एस+91 94232 49331*

Post a Comment

Previous Post Next Post