दिवसात अडीच लाखांचा दंंड ,लायसन्स नसलयाने वाहतुक शाखेची कारवाई .

 वाहन चालकानी मोटार वाहन कायदा नियम पाळून कायदेशीर कारवाई टाळावी...


प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे : 

 कोल्हापुर -शहर वाहतूक नियंत्रणेने नंबरप्लेट नसलेल्या व    लायसंनस न बाळगणाऱ्या वाहन धारकांवर कारवाईचा बडगा उगारुण  2 लाख 43 हजाराचा दंड वसूल करण्यात आला . वाहन धारकांना गेल्या काही दिवसांपासून प्रबोधन सुरु होते .तरी सुद्धा अनेक वाहन चालक नियमाचे उल्लंघन करत होते. त्यामूळे सोमवार पासून पोलिस अधीक्षक बलकवडे यांच्या आदेशा नुसार शहर वाहतुक  शाखे कडुन कारवाई करण्यात आली आहे. यात विहीत नमुण्यात नंबरप्लेट नसने, वाहन चालविताना लायसनस नसने, रहदारीस अडथळा ठरेल असे वाहन उभे करने आदी प्रकारचे नियम भंग केल्याबद्दल 417 वाहन चालकावर 2लाख 43 हजाराचा दंड आकारण्यात आला आहे.

 ही कारवाई सर्व पोलिस ठाण्यातील कर्मचारी व शहर वाहतुक शाखेच्या वतीने करण्यात आली.वाहन चालकानी मोटार वाहन कायदा नियम पाळून कायदेशीर कारवाई टाळावी.असे आवाहन शहर वाहतूक शाखेने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post