पुणे महापालिकेच्या शाळांतील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला

  बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क  भरण्यास स्थायी समितीत मान्यता..

प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

अनवरअली शेख

पुणे महापालिकेच्या शिक्षण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे परीक्षा शुल्कविभागांच्या शाळांतील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांचे राज्य भरण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, महापालिकेच्या शिक्षण विभागातील ४४ माध्यमिक शाळांमधून चार हजार ३९२ विद्यार्थी या वर्षी दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत. त्यांचे प्रती विद्यार्थी ४१५ रुपये आणि तंत्रशाळेतील २०० विद्यार्थ्यांचे प्रती ५२५ रुपये परीक्षा शुल्क भरण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

रासने पुढे म्हणाले, महापालिकेच्या शिक्षण विभागातील पाच कनिष्ठ महाविद्यालयातील ४४९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. वाणिज्य शाखा ४३० रुपये आणि विज्ञान शाखेसाठी प्रती ४९० रुपये परीक्षा शुल्क भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क: 

 पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post