गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये रंगल्या मॅटवर कबड्डी स्पर्धा




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

प्रो कबड्डी चा थरार आता शालेय जीवनापासूनच सुरू झाला आहे. पारंपरिक पध्दतीने म्हणजे मातीवर कबड्डी खेळणे ऐवजी मॅटवर कबड्डी खेळण्याचा सराव आतापासूनच अनेक शाळांनी सुरू केला आहे. यातील पहिले पाऊल इचलकरंजी शहरातील ना.बा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलने  टाकले आहे. यावर्षीच्या क्रीडा महोत्सवामध्ये मुलींचे कबड्डीचे सामने हे मॅटवर खेळविण्यात येत आहेत. राज्यात असा पहिलाच प्रयत्न झाला असल्याची माहिती शाळेच्या क्रीडा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

कोरोना महामारी  संसर्गा नंतर यावर्षी अनेक शाळांची मैदाने आता वार्षिक क्रीडा महोत्सवाने गजबजू लागली आहेत. या क्रीडा महोत्सवात वैयक्तिक आणि सांघिक अनेक खेळांचे सामने घेतले जातात. त्यातही कोल्हापूर जिल्ह्यात कबड्डी, खो-खो हे सामने रंगदार ठरतात.श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलचे अनेक खेळाडू यापूर्वी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. 

खेळासाठी या शाळेमध्ये  विशेष प्रोत्साहन दिले जाते. यावर्षीच्या कबड्डी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी प्रो कबड्डीचे देशातील आघाडीचे खेळाडू निलेश साळुंखे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत एखाद्या खेळामध्ये नैपुण्य मिळवले तर त्याला उज्ज्वल भवितव्य कसे असते याची माहिती खेळाडू  निलेश साळुंखे यांनी यावेळी दिली. निलेश हे मुंबई येथील एका छोट्याशा खोलीमध्ये राहत होते. मात्र प्रो कबड्डीनंतर त्यांना विशेष महत्त्व आले. देशातील एक अव्वल खेळाडू म्हणून त्यांची गणना झाली आणि सहाजिकच प्रो कबड्डीच्या सामन्यावर लाखो रुपयांची बोली त्यांच्यावर लागली. त्याच बरोबर त्यांना चांगल्या कंपनीत नोकरीही मिळाली. या पासून मोठी प्रेरणा अनेक खेळाडूंमध्ये निर्माण झाली.सहाजिकच मुलींमध्येही कबड्डीचा आनंद व उत्साह वाढला आहे.त्यानुसार श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. एस.एस. गोंदकर,क्रीडा विभाग प्रमुख  शेखर शहा यांनी कबड्डीचे सामने मॅटवर घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हायस्कूलने यावर्षी या वर्षी मुलींच्या कबड्डीचे सामने मॅटवर घेण्याचा निर्णय घेतला. सहाजिकच या मॅटवर कबड्डी खेळाचा एक वेगळाच थरार पहावयास मिळाला.

 या हायस्कूलने शालेय जीवनातच अनेक मुलींमध्ये निर्माण केलेली कबड्डी खेळाचीगोडी नक्कीच त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू बनण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. यासाठी श्री.ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा , चेअरमन हरीष बोहरा , व्हाईस चेअरमन उदय लोखंडे या पदाधिकाऱ्यांनी प्रोत्साहन दिले. तसेच हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती  एस. एस.गोंदकर , उपप्राचार्य आर. एस. पाटील, उपमुख्याध्यापिका सौ एस.एस.भस्मे  व पर्यवेक्षक   व्ही. एन कांबळे यांचे प्रोत्साहन व  क्रीडा विभाग प्रमुख  शेखर शहा यांचे खेळाडूंना विशेष मार्गदर्शन लाभत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post