जनतेने निवडुन दिलेले नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, खासदार यांनीही आजपर्यंत झोपडपट्टीधारकांना दिलेल्या अधिकाराची माहिती का दिली नाही ?

 शासनाच्या आदेशाचे काय लोणचे घालायचे का..?

बहुजन मुक्ती पार्टी ने केला पर्दाफाश...



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

अनवरअली शेख :

पुणे : शिरूर नगरपरिषद हद्दीतील सरकारी जमीनीवर असलेली झोपडपट्टी/ अतिक्रमण नियमित करून भोगवटादार वर्ग २ मध्ये नोंद करून शासनाधेशाची अमलबजावणी करावी अन्यथा बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने शृंखलाबद्ध आंदोलन करण्यात येईल असे निवेदन उपविभागीय अधिकारी मा. संतोष कुमार देशमुख, शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. अॅड प्रसाद बोरकर आणि भूमिअभिलेख कार्यालय शिरूर चे उपअधीक्षक ठाकरे यांना देण्यात आले.

त्यावेळी बहुजन मुक्ती पार्टी प्रदेश अध्यक्ष मा श्रीकांत दादा ओव्हाळ,बहुजन मुक्ती पार्टी पश्चिमी महाराष्ट्र युवा अध्यक्ष अमोल लोंढे,बहुजन मुक्ती पार्टी शिरूर तालुका अध्यक्ष फिरोजभाई सय्यद उपस्थित होते.

२०१८ साली महाराष्ट्र शासनाने आदेश पारित करून राज्यातील सर्व नगरपरिषद हद्दीतील सरकारी जमीनीवरील निवासी प्रयोजनार्थ असलेले झोपडपट्टी /अतिक्रमण नियमित करून भोगवटादार वर्ग २ मध्ये नोंद करावी, त्यासाठी झोपडपट्ट्यांचे सर्वे करून लेआऊट तयार करावे आणि १५०० चौरस फूटा पर्यंतची जागा नावावर करावे त्यासाठी शासनाने तीन सदस्यीय समिति गठित केली आहे त्या समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी, सचिव मुख्याधिकारी नगरपरिषद आणि सदस्य म्हणून उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. परंतु आजतागायत त्याबाबत कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही तसेच अपण निवडुन दिलेले नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, खासदार यांनीही आजपर्यंत झोपडपट्टीधारकांना याची माहिती का दिली नाही शासनाच्या आदेशाचे काय लोणचे घालायचे का..?

सत्ताधाऱ्यांनी तर नाहीच सांगितले परंतु विरोधीपक्षाच्या लोकांनीही जनतेला कळू दिले नाही ही शोकांतिका आहे. परंतु बहुजन मुक्ती पार्टी ने विडा उचलेला आहे जो पर्यंत शिरूर नगरपरिषद हद्दीतील सर्व झोपडपट्टीवासीयांना हक्काचे घर मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही असे बहुजन मुक्ती पार्टी शिरूर तालुका अध्यक्ष फिरोज भाई सय्यद यांनी सांगितले.

स्वातंत्र्याचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू आहे स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत तरीही आजपर्यंत नागरिकांना स्वतः च्या मालकीचे घर नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे, राज्यातील सर्व नगरपरिषदांनी ह्या शासनाधेशाची तत्काळ अमलबजावणी करावी आणि सर्व बहुजन समाजाला त्यांच्या हक्काचे घर देण्यात यावे अन्यथा राज्य स्तरावर तिव्र आंदोलन उभे केले जाईल असे बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्रीकांत दादा ओव्हाळ यांनी सांगितले. 

यावेळी बहुजन मुक्ती पार्टी शिरूर शहर अध्यक्ष समाधान लोंढे, बहुजन क्रांती मोर्चा चे श्रीकांत चाबुकस्वार सर, भारतीय बहुजन पालक संघ चे नाथाभाऊ पाचर्णे,सामाजिक कार्यकर्ते अॅड. स्वप्नील भैय्या माळवे, विशाल जोगदंड, मिलिंद जाधव, विलास देठे, शाबानभाई शहा, सिराज शेख, पीर मोहम्मद सय्यद, नादीरभाई शहा, प्रकाश डंबाळे आदी उपस्थित होते.


जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअलीशेख : 9975071717

Post a Comment

Previous Post Next Post