धम्मभूमी देहूरोड आंबेडकरी जनतेच्या वतीने 67 वा वर्धापन दिनानिमित्त

विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार समोर विविध कार्यक्रमाचे आयोजन.  

देहूरोड पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे  यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान,

       धम्मा रॅली बहुसंख्येने सहभागी व्हा. 



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

अनवरअली शेख :

  देहूरोड दि.२४ महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातून बौद्ध धर्मलयास गेल्यावर १२०० वर्षानंतर २५ डिसेंबर १९५४ रोजी बुद्धविहारात स्वहस्ते बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना केली व या कार्याने भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवित करून कार्याचा प्रारंभ केला त्यामुळे देहूरोड बुद्धविहाराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होऊन धम्मभूमी देहूरोड ऐतिहासिक बुद्ध विहार संबोधले जाते. १९५४ पासून प्रत्येक २५ डिसेंबरला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच भारतातील प्रत्येक प्रांताचे लाखो बुद्ध उपासक उपासिका बुद्ध मूर्ती दर्शनासाठी येतात असा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या धम्मभूमी ऐतिहासिक बुद्ध विहाराच्या ६७ वा वर्धापन दिनानिमित्त धम्म भुमी देहू रोड सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महा प्रवेश द्वार शिल्पा समोर आयोजन केले आहे. आयोजन केलेल्या कार्यक्रमात सकाळी नऊ वाजता राजाराम दादा अस्वरे व विजय गायकवाड यांचे हस्ते पंचशील ध्वजारोहन, देहूरोड पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे  यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान, उभारण्यात आलेल्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रवेशद्वार शिल्पाचे जमाखर्चाचे अहवालाचे प्रकाशन, दिशादर्शक फलकाचे अनावरण, भोजनदान, बुद्ध भीम गीतांचा गायनाचा कार्यक्रम, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेश द्वार शिल्पास भेट देणाऱ्याचा सन्मान असे दिवसभरातील कार्यक्रम आहेत. तसेच संध्याकाळी सहा वाजता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेश द्वार शिल्पा समोर दणदणीत धम्म रॅलीचे प्रारंभ होणार आहे, धम्म रॅली मुंबई पुणे महा मार्गाने सवाना हॉटेल आबुशेठ मार्गावरून वृंदावन चौक महात्मा फुले मंडई ऐतिहासिक नेताजी सुभाष चंद्र बोस चौक, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन होईल, तेथून पुढे धम्म ऐतिहासिक बुद्ध विहारात बुद्ध वंदना व विहारा शेजारील डॉ बाबासाहेब आंबेडकर महामानवाची अस्थी स्तुपास अभिवादन होऊन धम्म रॅलीची सांगता होईल. तरी या आयोजित  रॅलीत उपासक उपासिका व आंबेडकरी जनता ने बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.                     



*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post