क्राईम न्यूज : दहा हजारांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

  बारामती तालुक्यातील घटना


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे दि १७, बारामती तालुक्यातील  तलाठ्याला दहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले , व त्याला अटक करणयात आले आहे.ही कारवाई आज बुधवारी,दि.१७ रोजी  करण्यात आलेली आहे.मधुकर मारुती खोमणे वय ५८ असे अटक केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. खोमणे हे बारामती तालुक्यातील निंबुत सजा येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत, या प्रकरणी ४८ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीचे क्षेत्र दुरुस्ती नोंद करायचे होते. जमिनीचे क्षेत्र दुरुस्ती नोंद करण्यासाठी खोमणे याने तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता त्यानी तत्परतेने कारवाई केली.

लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी सापळा लावून बुधवारी खोमणे याला दहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप व-हाडे पुडील तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post