एस. बी. गँगवर मोका अंतर्गत कारवाईला मंजुरी

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहर परिसरात खून ,खूनाचा प्रयत्न ,खंडणी ,अपहरणअशा विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुंड एस. बी. उर्फ सुदर्शन बाबर याच्यावर मोका अंतर्गत कारवाईच्या प्रस्तावाला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक मनोजकुमार लोहिया यांनी मंजूरी दिली आहे. यामध्ये संतोष जाधव खून प्रकरणी अटकेतील दोन अल्पवयीन युवकांसह 8 जणांचा समावेश आहे. सुदर्शन बाबर याच्यावर दुसर्‍यांदा मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे.


इचलकरंजी शहरासह जिल्ह्यातील विविध भागात पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुंड एस. बी. उर्फ सुदर्शन बाबर याने

संघटीत गुन्हेगारी टोळीच्या माध्यमातून मोठी दहशत निर्माण केली होती. त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, गर्दी, मारामारी यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याची दखल घेऊन इचलकरंजीचे तत्कालीन अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे आणि जयसिंगपूरचे पोलीस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक सिताराम डुबल यांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली. या प्रकरणातून तो काही महिन्यांपूर्वी कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर इचलकरंजी शहरातील जवाहरनगरातील संतोष उर्फ पप्पू जाधव याचा महिन्याभरापूर्वी साथीदारांच्या मदतीने सशस्त्र हल्ला करुन भररस्त्यात निर्घृणपणे खून केल्याचे व यामागे

तोच मास्टरमाईंड असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलीस उपअधिक्षक बाबुराव महामुनी आणि त्यांच्या पथकाने बाबर याला आठवडाभरापूर्वी गडहिंग्लज तालुक्यातून अटक केली आहे. जाधव खून प्रकरणी पोलिसांनी सुदर्शन बाबर, शुभम काणे, निखील माने, विपुल नाईक, अभिषेक आसाल, महेश संकपाळ व दोन अल्पवयीन युवकांना अटक केली  आहे.

पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी सुदर्शन बाबर याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत या बाबर गँगवर मोका अंतंर्गत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपअधिक्षक महामुनी आणि त्यांच्या पथकाने गुंड बाबर आणि त्याच्या सात साथीदाराविरुद्ध मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करुन तो छाननीसाठी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्याकडे पाठवला होता.त्यानुसार त्यांनी प्रस्तावाची छाननी करुन सदरचा प्रस्ताव

पुढील कार्यवाहीसाठी पोलीस अधिक्षक कार्यालयाकडे पाठवला. त्याची पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी छाननी करून, अंतिम मंजूरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठवला. विशेष पोलीस महानिरीक्षक लोहिया यांनी या प्रस्तावाची छाननी करत त्याला मंजुरी दिली आहे.या कारवाईने गुन्हेगारी क्षेत्रात पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे.



जगदीश अंगडी : कार्यकारी संपादक ;

Post a Comment

Previous Post Next Post