माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात शंभर कोटी वसुलीचा बॉम्ब टाकून खळबळ उडवून देणाऱ्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग फरार घोषित

 गेल्या अनेक दिवसांपासून परमबीर सिंग हे गायब आहेत.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी  : सुनील पाटील

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात शंभर कोटी वसुलीचा बॉम्ब टाकून खळबळ उडवून देणाऱ्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्यामुळे अखेर मुंबई किला कोर्टाने परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परमबीर सिंग हे गायब आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी होईल अशी शक्यता होती. पण त्या आधीच खंडणी प्रकरणात परमबीर सिंग यांना मुंबई किला कोर्टाने फरार घोषित केले आहे.

गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्यांत फरार घोषित करण्यात आले आहे. रेल्वेचं तिकीट हरवलं? काळजी करू नका, Railway चा हा नियम करेल तुमची मदत याच प्रकरणी रियाज भाटी आणि विनय सिंग यांना देखील फरार घोषित करण्यात आलं आहे. याच गोरेगाव खंडणी प्रकरणी पोलीस निरीक्षक आशा कोरके आणि नंदकुमार गोपाळे यांना अटक करण्यात आली आहे.

पोत्यात बांधलेल्या अवस्थेत नदीत आढळला मृतदेह, खळबळजनक घटनेनं कराड हादरलं! परमबीर सिंग खंडणी प्रकरणात राज्य सरकारने SIT स्थापन केली होती. या समितीने केलेल्या चौकशी दरम्यान पुरावे आढळून आले होते. त्यानंतर स्टेट सीआयडीने दोन पोलीस निरीक्षकांना अटक केली.

नंदकुमार गोपाले आणि आशा कोरके अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नाव आहे. या दोघांनीही गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 लाख रुपये घेतले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली. या दोघांनी तक्रारदाराकडून पैसे घेण्याकरता हवालाचा वापर केला. परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरुन पैशांचा व्यवहार झाला होता. हवाला ॲापरेटर मोमिन याच्या माध्यमातून व्यवहार हा व्यवहार झाला होता.

Post a Comment

Previous Post Next Post