इचलकरंजीतील एक बुजुर्ग ,जुने जाणते रंगकर्मी ,लेखक, दिग्दर्शक मा.श्रीकांतजी फाटक कालवश..

मा.श्रीकांतजी फाटक यांना समाजवादी प्रबोधिनी परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन....


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 मराठी नाट्यविश्वात राज्यभर नावलौकिक असलेले  इचलकरंजीतील एक बुजुर्ग ,जुने जाणते रंगकर्मी ,लेखक, दिग्दर्शक मा.श्रीकांतजी फाटक आज शुक्रवार ता. १२ नोव्हेंम्बर २०२१ रोजी वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी कालवश झाले. अतिशय व्याकप समाजभान असलेल्या फाटक साहेबांचे जाणे ही मोठी सामाजिक - सांस्कृतिक हानी आहे. साहित्य,कला,नाटक,राजकारण,वैचारिक अशा सर्व गोष्टींवर अथक बोलणाऱ्या श्रीकांतजीशी होणारा संवाद हा फार काही देऊन जायचा.गेली तीस वर्षे महिन्या - दीड महिन्यातून किमान एक वेळा ते समाजवादी प्रबोधिनीत यायचे.आमच्या विविध विषयांवर चर्चा व्हायच्या.त्यांच्याशी होणाऱ्या गप्पांतून त्यांचे अफाट वाचन ,चिंतन दिसून यायचे.त्यातून ते बरंच काही देऊन जायचे.माझ्याही लिखाणाचे ते सूक्ष्म वाचक होते याचा मला नेहमीच अभिमान राहील.एक फार चांगला माणूस आपण गमावला आहे.मा.श्रीकांतजी फाटक यांना समाजवादी प्रबोधिनी परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन..

Post a Comment

Previous Post Next Post