पीएमआरडीए ,च्या सदस्यपदाच्या निवडणुकीत पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच उमेदवार निवडून आले.

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे दि १२ नोव्हेंबर, महानगर नियोजन समिती  पीएमआरडीए ,च्या सदस्यपदाच्या निवडणुकीत पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच उमेदवार निवडून आले. भाजपचे ६ आणि राष्ट्रवादीचे ३ असे ९ नगरसेवक नियोजन समितीवर निवडून आले.

पिंपरी महापालिकेतील भाजपाचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक चंद्रकांत नखाते, संदीप कस्पटे, निर्मला गायकवाड, वसंत बोराटे, जयश्री गावडे यांनी बाजी मारली आहे. तर, विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित गव्हाणे, मोरेश्वर भोंडवे, डॉ. वैशाली घोडेकर हे तिघेही विजयी झाले. त्यामुळे पुणे महानगर नियोजन समितीवर हे ९ नगरसेवक सदस्य असणार आहेत.

पीएमआरडीए हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील विविध विकासकामांच्या दृष्टीने पुणे महानगर नियोजन समितीची निवडणूक महत्वाची ठरली. सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणुकीमध्ये लक्ष घातले होते.  मोठे नागरी मतदार संघात पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका  या मतदारसंघात  २२ जागा होत्या. तर, २३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी बुधवारी मतदान झाले. पिंपरी महापालिकेत ९८% टक्के झाले होते.  त्याची मतमोजणी आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे झाली.


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post