सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यामार्फत उड्डाण पुलावरील खड्ड्यांची... पुन्हा दुरुस्ती...

 

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रतिनिधी : सुनील पाटील

 पनवेल मधील तिर्थरुप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. एमएसआरडीसी विभागास पुलावर पडलेल्या खड्ड्यांचे काम करण्यास सांगितले होते. मात्र त्यांच्या कडून सदर कामात दिरगांई होत होती. सदर उड्डाणपुलावरून प्रवास करणाऱ्या नागरीकांच्या सुरक्षितेच्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ऑगस्ट महिन्यात स्व खर्चाने या उड्डाणपुलावरील सर्व खड्ड्यांची दुरुस्ती केली. 

या पुलावर वाहनांची सतत वाहतूकीमुळे पुन्हा तिर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डाण पुलावर खड्डे पडल्याचे दिसुन आले आहे. याकारणास्तव सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यामार्फत सदर उड्डाण पुलावरील खड्डे पुन्हा दुरुस्ती करून देण्यात आले असून त्यांच्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post