१०० कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा टप्पा पूर्ण; विद्यार्थ्यांची मानवरुपी साखळी करून अभिनंदन

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रतिनिधी : सुनील पाटील

भारताचे यशस्वी पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली भारताने १०० कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे मंडळ तसेच सुषमा पाटील विद्यालय कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने दि 22-10-2021 रोजी सुषमा पाटील विद्यालय येथे विद्यार्थ्यांची मानवरुपी साखळी करून अभिनंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .या कार्यक्रमासाठी नगरसेवक दिलीप पाटील, नगरसेवक डॉ अरुणकुमार भगत, नगरसेवक विजय चिपळेकर, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, व्यापारी आघाडी अध्यक्ष नाना मगदूम, कैलास सरगर, आध्यात्मिक सेल संयोजक विनोद खेडकर, उत्तम जाधव, महिला मोर्चा उपाध्यक्षा सुरेखा लांडे, कल्पना जाधव, सुरेंद्र हल्लीकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post