महानगरपालिकेत कॉंग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर येईल...शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे


तळागळातील कार्यकर्ता हीच कॉंग्रेस पक्षाची खरी ताकद आहे.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :  प्रतिनिधी :

 पुणे -  आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, विचार घरोघरी पोहचवणार आहोत. नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांचा योग्य मेळ साधत महापालिकेत कॉंग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्‍वास माजी गृहराज्यमंत्री आणि शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी  व्यक्‍त केला.

रमेश बागवे म्हणाले की,  'तळागळातील कार्यकर्ता हीच कॉंग्रेस पक्षाची खरी ताकद आहे. तसेच कॉंग्रेसला मानणारा मोठा वर्ग पुणे शहरात आहे. त्याची नाळ मधल्या काही काळात तुटली आहे. ती पुन्हा जोडण्यासाठी पक्षाकडून संघटनात्मक बांधणी तसेच नियोजबद्ध काम केले जात आहे. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात बुथ स्तरापासूनच कामाला सुरूवात करण्यात आली आहे. ब्लॉक अध्यक्ष, सेल अध्यक्ष तसेच वेगवेगळ्या विंगच्या अध्यक्षांसह आजी-माजी नगरसेवकांना जोडून देत पक्ष पुन्हा घराघरांत पोहचविण्याचे काम सुरू आहे. सत्ताधाऱ्यांनी केलेली चुकीची कामे जनतेसमोर आणत आहोत. पुढच्या टप्प्यात प्रभाग निहाय बैठका घेऊन ही मोहीम आणखी व्यापक करण्यावर पक्षाचा भर आहे. त्यामुळे कॉंग्रेसला आगामी महानगरपालिका निवडणुकीत नक्कीच चांगले यश मिळेल.'

युवा वर्गाला देणार संधी

'आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. त्यानंतर पक्षश्रेष्ठी सांगतील त्या सूचनांनुसार काम होईल. मात्र, तूर्तास कॉंग्रेसची भूमिका स्वबळाची असून त्याप्रमाणे तसेच आघाडी झाली तर काय, त्या अनुषंगाने कॉंग्रेसची निवडणुकीची तयारी पूर्ण आहे,' असा दावा बागवे यांनी केला आहे. गेल्या काही वर्षांत युवा वर्ग पक्षाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला आहे.

त्या काळात जास्तीत जास्त युवकांना पक्षाकडून संधी दिली जाईल. शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये अनेक चळवळीतील युवक पुढे येत आहेत. त्यांनाही पक्षाकडून ताकद देऊन या महापालिका निवडणुकीत संधी देण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post