देशांमध्ये १०० कोटी नागरीकांचे मोफत लसीकरण पुर्ण झाले हे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुळे -- भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी : देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी १०० कोटी जनतेला मोफत लस दिली. देशाचे कनखर नेतृत्व नरेंद्र मोदीजी यांच्या समयसुचकता व कलपत्तेने देशातील जनतेचे आरोग्य या जागतीक कोविड महामारीचे संकटाची जी दुसरी लाट निर्माण झाली होती. तरीही मोठया शिथापीने जास्तीत जास्त लोकांना कोविड लसीचा पुरवठा करुन ते संकट थोपवले. 

देशामध्ये जवळपास गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे आणि लसीकरण मोहीम मोठ्याप्रमाणात राबवली जात आहे. त्यातच आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज भारताने एक नवीन इतिहास रचला आहे. आज भारताने कोरोना लसीचा १०० कोटी डोसचा आकडा पार केला आहे. हे शक्य झाले ते फक्त डॉक्टरर्स, नर्सेस,व पॅरामेडिकल कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने शक्य झाले.यामध्ये आपले अनमोल असे योगदान आहे. तसेच जास्तीत जास्त नागरीकांनी लस घेऊन इचलकरंजी शहर हे  १००% लसीकरण पुर्ण करणेसाठी नागरीकांनी सहकार्य करावे असे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी आज चांदणी चौक येथील नागरी प्रथमिक आरोग्य केंद्रावर भेट दिली त्यावेळेस बोलत होते.

यावेळी डॉक्टरर्स , नर्सेस, पॅरामेडिकल कर्मचारी यांचा कोव्हिड योध्दा म्हणुन पुष्पगुच्छ देवून विषेश यथोचित सत्कार सुरेश हाळवणकर व नगरीच्या नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष ॲड.अनिल डाळ्या. , ज्येष्ठ नेते मिश्रीलाल जाजु , अरविंद शर्मा ,अमर कांबळे , अरुण कुंभार , राजेंद्र पाटील , अमृता भोसले, युवा मोर्चा अध्यक्ष प्रविण पाटील , प्रमोद बचाटे , अरविंद चौगुले , सचिन माळी,सागर कचरे , म्हाळसाकांत कवडे , डॉ.राजु पुजारी , उत्तमसिंग चव्हाण , अशोक साळुंखे , विपुल खोत आदि प्रमुख मान्यवर उपस्थिती होते.

Post a Comment

Previous Post Next Post