महिलांनी उद्योगात भरारी घेवून आत्मनिर्भर व्हावे : नगराध्यक्षा ॲड. सौ.अलका स्वामी

 




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 इचलकरंजी : महिला उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी रोटरी क्लब अँन्सचा दिवाळी धमाका महिलांसाठी मोठी पर्वणी असते. या माध्यमातून महिलांनी उद्योगात भरारी* *घ्यावी व आत्मनिर्भर व्हावे,असे आवाहन नगराध्यक्षा ॲड. सौ.अलका स्वामी (वहिनी ) यांनी केले.

रोटरी कल्ब आॕफ इचलकरंजी अॕन्स वतीने आयोजित महिलांसाठीच्या दिवाळी धमाकाचा शुभारंम नगराध्यक्षा.सौ अलका स्वामी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.

शुक्रवार व शनिवार या दोन दिवस चालणाऱ्या दिवाळी धमाकामध्ये महिलांना विविध स्टॉल उपलब्ध करण्यात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गृहोपयोगी* *वस्तू,कॉस्मेटिक्स, गारमेंट्स, संसारोपयोगी वस्तू, इमिटेशन ज्वेलरी,ड्रेस मटेरियल, होम फर्निचर, डेकोरेटिव्ह मटेरियल तसेच देशी-विदेशी खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले आहेत.या सर्व स्टॉलची पाहणी करत  ग्राहक ते विक्रेते, कमी व वाजवी दरात थेट विक्री होणाऱ्याया दिवाळी धमाकाचे कौतुक नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी केले.यावेळी रोटरी ॲन्सच्या अध्यक्षा सौ. अलका* *रावळ,प्रोजेक्ट चेअरमन सौ. स्मिता नाकिल, सेक्रेटरी सौ. मेघा घायतिडक,सौ. स्वाती सातपुते,सौ पुष्पा धुत यांसह रोटरी कल्बचे पदधिकारी तसेच महिला उद्योगजिका उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post