खेड येथील महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. डी. कुलकर्णी यांच्यावर दंडात्मक कारवाई करा.....तनवीर मुजावर


               


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

ईद ऐ मिलाद,कोजागिरी पौर्णिमा,व महर्षि वाल्मिकी जयंती देशभर साजरा होत असताना मनु वृत्तीच्या प्राचार्य व्हि डी.कुलकर्णी यांनी शासकिय आदेशाचा भंग करून मुस्लिम व इतर  समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या. कर्मचारी व शिक्षकगण यांच्या कडून साफसफाई करून घेतल्याने व कर्मचारी यांनी विरोध केले तरी बळजबरीने सुट्टीच्या दिवशी कामावर बोलवून काम करुन घेतले या बाबत सविस्तर माहिती ह्युमन राईट्स जस्टिस असोशिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष तनवीर मुजावर व पुणे जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर पात्रे यांनी प्रेस मीडिया वृत्त वाहीनीला माहिती  दिली .                 

  राजगुरुनगर खेड तालुक्यातील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. डी. कुलकर्णी यांनी दिनांक १९ ऑक्टोबर २०२१ रोजी ईद-ऐ-मिलाद ची तसेच कोजागिरी पौर्णिमा महर्षि वाल्मीकि जयंती च्या निमित्ताने शासकीय सुट्टी जाहीर होती..तसे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सर्वे महाविद्यालयांना आदेश पत्र आहे. असे असताना सुद्धा  प्राचार्य व्ही.डी.कुलकर्णी यांनी   शासकीय आदेशा चा भंग करून मुद्दाम महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना महाविद्यालयात कामावर बोलून त्यांच्याकडून काम करून घेतले याच दिवशी ईद-ए-मिलाद या मुस्लिम पवित्र दीना बरोबरच कोजागिरी पौर्णिमा वाल्मिकी जयंती होती. महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा विरोध असताना मनू वृत्तीच्या प्राचार्य व्ही. डी. कुलकर्णी यांनी मुद्दाम अधिकार नसताना शासकीय आदेशाचा भंग करून महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलुन त्यांच्या कडून कामकरुन घेतले त्यामुळे मुस्लिम बांधवांचे धार्मिक भावना दुखावल्या  व त्याच बरोबर इतर समाजाच्या भावनाही त्यांनी दुखावल्या या बद्दल प्राचार्य व्ही.डी.कुलकर्णी यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी असे निवेदन ह्युमन राईट्स  जस्टिज असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर, पुणे जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर पात्रे ,पुणे जिल्हा खजिनदार अकिल तांबोळी यांनी पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, राज्याचे सह संचालक उच्च शिक्षण, कुलगुरू ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे, विद्यापीठ यांना दिले आहे.                   

 या बाबत जस्ट आज वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे यांनी प्राचार्य व्ही. डी. कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता, तुम्ही शासकीय सुट्टी असताना कर्मचाऱ्यांना महाविद्यालयात कामावर का बोलावले ?.तुम्हाला असा आदेश कोणाचा होता का ? पुणे विद्यापीठाने सर्व महाविद्यालयाना सुट्टी जाहीर केले आहे तरी आपण कर्मचारी  वर्गाला कामावर का बोलाविले ?   असे विचारले असता  व्ही. डी. कुलकर्णी म्हणाले मला कोणाचे आदेश नव्हते, कर्मचार्यानी ही  येण्यास विरोध केला होता. तरी मी माझ्या मर्जीने कर्मचार्यांना महाविद्यालयात कामांवर बोलविले, महाविद्यालयात घटस्थापना केली होती त्याची साफसफाई करायची होती. चंद्रशेखर पात्रे यानी प्राचार्य यांना विचारले घटस्थापना होऊन चार दिवस झाले मग आपण सुट्टीच्या दिवशीच का? बोलावले त्यावर प्राचार्या यांनी म्हटले आजच्या सुट्टीचा, पर्याय सुट्टी नंतर देण्यात येणार असल्याचे प्राचार्य व्ही.  डी. कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच बहुजन शिक्षण शिक्षकेत्तर महासंघाचे अध्यक्ष दिपक यादव महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर समन्वय समितीचे जिल्हा अध्यक्ष शक्ती मावळे यांनी ही तक्रार निवेदन देण्यात येणार असल्याचे माहिती दिली आहे.


 पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली शेख


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post