विशेष वृत्त : निगडी मुस्लिम दफन भूमिचे निकृष्ठ दर्जाचे व अतिधोकादायक प्रवेशद्वार पाडून पुन्हा बनविण्याची मागणी



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

निगडी पिंपरी चिंचवड येथील मुस्लिम दफन भूमिचे प्रवेशद्वार चुकीने व दुर्लक्ष करून निकृष्ठ दर्जाचे व अतिधोकादायक असे प्रवेशद्वार  बनविल्याबद्दल ते पाडून नविन मिनार व गुम्मत प्रवेशद्वार बांधकाम पुन्हा सुरक्षित पद्धतीने तयार करून द्या अशी मागणी स्वस्थचे अध्यक्ष आलमगीर युसूफ कुरेशी  यांनी केली आहे, महापालिकेने अंदाजे  ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता ,

त्या निधीचा समबंधीत अभियंता विजय कुमार काळे,कार्यकारी अभियंता  स्थापत्यविभाग फ क्षेत्रीय कार्यालय निगडी,पी,चिं, तसेच शाहजी गायकवाड उप अभियंता स्थापत्यविभाग,व शोएब शेख कनिष्ठ अभियंता , स्थानिक लोकतिनिधींनी चुकीच्या पद्धतीने चुराडा केला व धोकादायक असे निकृष्ठ दर्जाचे प्रवेशद्वार बांधले असे आरोप नागरिकांनी त्या ठिकाणी केले आहे, या बाबतची सविस्तर माहिती  आलम युसूफ कुरेशी यांनी प्रेस मीडियाला  दिली .

 दिनांक २८/०७/२०१६ रोजीच्या पत्रअनुशंगाने मुस्लिम दफन भूमिच्या भिंतीवर   महराब व मिनार बनवून देण्याची मागणी केली असता, दिनांक ५/३/२०१८ रोजी फ क्षेत्रिय कार्यालय स्थापत्यविभाग निगडी यांचे आयुक्त कक्ष आवक क्र . ११४७ दिनांक ०६ / ०३ / २०१८ रोजीच्या पत्रान्वये मान्यता प्राप्त झाली होती . लिपीक स्थापत्य विभाग " " क्षेत्रीय कार्यालय निगडी , पुणे -४११०४४ , सदर काम सुमारे तीन महिन्यां पर्यंत चालू होते त्यानंतर सुमारे पाच - सहा महिन्यांपासून काम बंद होते . आम्हाला संबंधीत कनिष्ठ अभियंता यांनी कळविले की , पैसे संपल्यामुळे काम बंद असता महाराणा प्रताप निगडी गावठाण यांच्या कामाचे पैसे काम पूर्ण होवून शिल्लक आहेत 

ती निधिच्या पैश्या मध्ये तुमचे काम करून देणार आहे असं सांगितले.  काही दिवसात सिमा भितीचे राहिलेल प्लास्टरचे काम सुरू झाले असता लॉकडाऊनमुळे परत काम बंद झाले, त्यानंतर राहिलेले प्लास्टरचे काम पूर्ण करण्यात आले असता प्रवेशद्वाराचे अर्धवट काम सोडून काम बंद करण्यात आले

 मा शोहेब शेख , कनिष्ठ अभियंता स्थापत्यविभाग निगडी पुणे- ४४ यांनी आम्हांस कळविले प्रवेशद्वाराचे दोन मोठे मिनार चुकीचे व धोकादायक बनविण्यात आले आहे ते आता पूर्ण करता येणार नाही सदर मुस्लिम दफन भूमिच्या सौंदर्यासाठी सुमारे ५० लाख रुपये इतके पिं.चिं . महानापालिकेने खर्च दिला असून काम पूर्ण झाले नाही व चुकीचे व धोकादायक काम करून प्रवेशद्वाराचे अपूर्ण काम व त्याचा कलर , वायरिंग , लाईट काहीच काम केले नाही तसेच सौदर्य दिसण्या एवजी खंडारा सारखे बनवून सोडले आहे . सबब , चुकीचे व धोकादायक मिनार पाडून नविन मिनार व त्याबरोबर गुम्मत बनवून राहिलेले कलर , वायरिंग , लाईट व इतर कामे करून मिळावे म्हणून यासाठी  विजयकुमार काळे कार्यकारी अभियंता , स्थापत्य विभाग फ क्षेत्रिय कार्यालय निगडी पुणे यांना निवेदन  दिले आहे.


 पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली शेख


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post