राज्यस्तरीय अंकनाद पाढे स्पर्धेचे मंत्रालयात पारितोषिक वितरण गणिताच्या प्रतिभेला वाव मिळावा : सुभाष देसाई




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पुणे :अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा (द्वितीय पर्व)चा  पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी दिनांक ६ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता  मंत्रालय ,मुंबई येथे मराठी भाषा,उद्योग आणि खनीकर्म मंत्री सुभाष देसाई,अभिनेत्री सौ.चिन्मयी सुमित यांच्या हस्ते झाले.  

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्याना उत्तेजन देण्यासाठी,गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने,मॅप एपिक कम्युनिकेशन्स  प्रा.लि आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय अंकनाद पाढे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.७ गटातील प्रातिनिधिक ७ विजेत्यांना  गौरविण्यात आले. 

 .जिल्हास्तरीय फेरीत राज्यभरातून १३८२ स्पर्धकांनी नोंदणी केली होती. यशस्वी विद्यार्थ्याना  प्रत्येक गटात राज्य पातळीवर रुपये ११ हजार, ७ हजार, ५ हजार अशी पहिल्या ३ क्रमांकांना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे ही  पारितोषिके म्हणून देण्यात आली.

  मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे,मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. चे संचालक मंदार नामजोशी,संचालक पराग गाडगीळ, मराठी काका उर्फ अनिल गोरे , समीर बापट, निर्मिती नामजोशी ,रसिका सुतार उपस्थित होते.

सुभाष देसाई म्हणाले, ' भारतीय संस्कृतीतील चांगल्या पण काळाच्या ओघात मागे पडलेल्या गोष्टींना उजाळा देण्याचा प्रयत्न अंकनाद पाढे स्पर्धतून झाला. शासन अशा उपक्रमांना प्रोत्साहन, सहाह्य देईल,गणिताची गोडी लहान वयात निर्माण करण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. मराठी भाषा विभागामार्फत मराठी भाषेचे वैभव पुढे आणण्याचे प्रयत्न आम्ही मोठया प्रमाणात करू. गणितासारखा भीती वाटणारा विषय अंक नादच्या उपक्रमातून नादमधूर होत आहे. गणिताच्या वाटेला जे जात नाहीत, त्यांनाही हा प्रवास आवडायला लागेल. त्यातून प्रतिभेला वाव मिळेल.

अभिनेत्री चिन्मयी सुमीत म्हणाल्या, ' ताल, नाद या बरोबर गणिताचा प्रवास पुढे जात आहे, हे महत्वाचे आहे. यशस्वी व्हायचे असेल तर पाढयांना पर्याय नाही. मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांच्या मुळे अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळत आहे. मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करण्याचा निर्णय त्यांच्या कार्यकाळात झाला, ही महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण गोष्ट आहे.

मंदार नामजोशी म्हणाले,' अंकनाद पाढे  स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल,हा उद्देश होता. अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून लक्षात राहतात,आत्मसात होतात.त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंकनाद तर्फे पाढे  स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचे आयोजन केले होते . जिल्हा पातळी,  राज्य पातळीवर स्पर्धा घेतली . ही स्पर्धा मराठी भाषेतून घेतली . सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्याना पाढे  स्पर्धा खुली होती. वर्षातून दोन वेळा याप्रमाणे सलग पाच वर्ष ही पाढे स्पर्धा घेतली जाणार आहे .

स्वराज कुलकर्णी ( प्रथम क्रमांक, बाल गट ), कैवल्य खेडेकर ( प्रथम क्रमांक, इयत्ता  दुसरी तिसरी गट ), शाश्वत कुलकर्णी (द्धीतिय क्रमांक ,  इयत्ता दुसरी तिसरी गट ), सृष्टी कुलकर्णि( प्रथम क्रमांक , इयत्ता सहावी सातवी गट ), दामोदर चौधरी ( द्वीतिय क्रमांक,  इयत्ता सहावी सातवी गट ), कृतीका किणीकर ( प्रथम  क्रमांक,  इयत्ता आठवी ते दहावी गट ), दामोदर चौधरी ( प्रथम, खुला गट ) यांना गौरविण्यात आले.

पूजा जाधव, वासंती काळे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल गोरे यांनी आभार मानले.


Post a Comment

Previous Post Next Post